पंचावन्न ट्रक कचरा गोळा; पिंपरी चिंचवडमध्ये ‘माझी पवनामाई स्वच्छ पवनामाई’ उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 12:50 PM2017-12-07T12:50:15+5:302017-12-07T12:55:00+5:30

‘माझी पवनामाई स्वच्छ पवनामाई’ या अभियानाला १७ दिवस झाले आहेत. या अभियानांतर्गत ५५ ट्रक कचरा गोळा करण्यात आला आहे. 

55 trucks garbage collect; Pimpri Chinchwad's pavna river Clean campaign | पंचावन्न ट्रक कचरा गोळा; पिंपरी चिंचवडमध्ये ‘माझी पवनामाई स्वच्छ पवनामाई’ उपक्रम

पंचावन्न ट्रक कचरा गोळा; पिंपरी चिंचवडमध्ये ‘माझी पवनामाई स्वच्छ पवनामाई’ उपक्रम

Next
ठळक मुद्देजलपर्णीमुक्त पवना ही लोकचळवळ झाली पाहिजे : अमर साबळेरोज ३५ ते ४० मजूर काम करत असताना एनजीओ, निसर्गप्रेमींचा सहभाग

रावेत : रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडी, जलमैत्री अभियान, भावसार व्हीजन इंडिया, शेखर चिंचवडे यूथ फाउंडेशन, मोरेश्वर भोंडवे मित्र परिवार, जेएसपीएम महाविद्यालय-ताथवडे या संस्थांच्या माध्यमातून ‘माझी पवनामाई स्वच्छ पवनामाई’ या अभियानाला १७ दिवस झाले आहेत. या अभियानांतर्गत ५५ ट्रक कचरा गोळा करण्यात आला आहे. 
भावसार व्हीजनचे राजीव भावसार, रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडीचे प्रदीप वाल्हेकर, शेखर चिंचवडे यूथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शेखर चिंचवडे, नदी संवर्धन मोहिमेत गेली १७ वर्षे काम करणारे सोमनाथ मसुडगे, सोमनाथ हरपुडे, युवराज वाल्हेकर,माता जोगेश्वरी महिला बचत गटाच्या अध्यक्षा माया वाल्हेकर, वासंती कुहार्डे आदींनी पुढाकार घेऊन ही मोहीम सुरू केली. 
साबळे म्हणाले, ‘‘रोटरी क्लब राबवीत असलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून, यामुळे शहराला भेडसावणाऱ्या समस्या भरपूर प्रमाणात कमी होतील. यासाठी लागणाऱ्या सर्व मूलभूत गोष्टी पुरविण्यासाठी महापालिका, राज्य सरकार, केंद्र सरकार याकडे पुरवठा करतो, असे आश्वासन खासदार अमर साबळे यांनी वाल्हेकरवाडी येथील जाधव घाट येथे केले. आज पवना नदीसंवर्धन व नदीपात्राची स्वच्छता अतिशय महत्त्वाची असून, यासाठी शासकीय स्तरावर वेगळी समिती स्थापन करून जलपर्णीचा समूळ नाश, दूषित पाणी इत्यादी गोष्टींचा विचार केला जाणार आहे. जलपर्णीमुक्त पवना ही फक्त वाल्हेकरवाडी, रावेत किंवा नदीच्या बाजूला राहणाऱ्यांची जबाबदारी न राहता ही मोठी लोकचळवळ झाली पाहिजे. त्याकरिता सर्वांनी या मोहिमेत सहभागी झाले पाहिजे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. 
जलपर्णी जमा होण्यासाठी वालरोप बांधण्यात आले होते. त्यावर साचलेली जलपर्णी काढण्यात आली. या उपक्रमामध्ये देश का सच्चा हिरो म्हणून ओळख असणारे, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गौरवीत केलेले ७० वर्षांचे चंद्रकांत राधाबाई दामोदर कुलकर्णी, रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर, भावसार व्हीजन इंडियाचे राजीव भावसार, महापालिका कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, पी.सी.सी.एफ.चे धनंजय शेडबाळे, हेमंत गावंडे, अमोल देशपांडे, गणेश बोरा, वैभव गुघे, शेखर चिंचवडे यूथ फाउंडेशनचे सचिन काळभोर, जेएसपीएमचे प्रा. भारती महाजन व त्यांचे ५० विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे सूर्यकांत मुथियान, सी.ई.एफ.फोरमचे धनंजय काळभोर व राजकिरण ठाकूर, जाणता राजा प्रतिष्ठानाचे अध्यक्ष चेतन शिंदे व सहकारी, डॅशिंग डॅड टीम व कल्याणी इंटरप्रायजेसचे अनिल नेवाळे, वाल्हेकरवाडीतील विविध बचत गटांतील महिला, गजानन चिंचवडे, अशोक भालके, अशोक वाल्हेकर व वाल्हेकरवाडीतील तरुण व लहान मुले-मुली व ग्रामस्थ सहकुटुंब या अभियानामध्ये सहभागी झाले होते.

पालिका नदीसुधार योजनेच्या अंतर्गत असणाऱ्या सर्व सुविधा आपण या उपक्रमाला उपलब्ध करून देऊ, तसेच महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन हे आपल्या पाठीशी राहील. शासन पातळीवर लागणारे सर्व सहकार्य मी करेन, असे आश्वासनही साबळे यांनी दिले. तसेच रोटरीच्या उपक्रमाला ११ हजार रुपयांची देणगीही खासदार अमर साबळे यांनी दिली. उपक्रमासाठी रोटरी क्लबच्या वतीने ठेवलेल्या देणगी कलशामध्ये एकूण ५१ हजार १२० रुपयांची रक्कम जमा झाली. 
रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडी अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर यांनी जलपर्णीमुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई-उगम ते संगम अशा सुरू केलेल्या अभियानाचा हा तिसरा आठवडा आहे. यामध्ये रोज ३५ ते ४० मजूर काम करत असताना प्रत्येक रविवारी विविध एनजीओ व निसर्गप्रेमी आणि लोकसहभागातून हे अभियान जोराने पुढे जात आहे. रोटरीचे सर्व सदस्य, वाल्हेकरवाडी ग्रामस्थ आणि शहरातील सर्व निसर्गप्रेमी व रानजाई प्रकल्पातील मजूर यांनी आज पाच ट्रक जलपर्णी नदीबाहेर काढून हे अभियान पूर्णत्वास नेले.

Web Title: 55 trucks garbage collect; Pimpri Chinchwad's pavna river Clean campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.