५४ खेळाडूंची निवड
By Admin | Updated: July 21, 2015 03:33 IST2015-07-21T03:33:07+5:302015-07-21T03:33:07+5:30
किक बॉक्सिंग असोसिएसन आॅफ पिंपरी-चिंचवड व सरस्वती भुवन इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या वतीने जिल्हास्तर किक बॉक्सिंग

५४ खेळाडूंची निवड
पिंपळे गुरव : किक बॉक्सिंग असोसिएसन आॅफ पिंपरी-चिंचवड व सरस्वती भुवन इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या वतीने जिल्हास्तर किक बॉक्सिंग निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यातून ५४ खेळाडूंची बुलढाणा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
पिंपरी-चिंचवड जिल्ह्यातून २४२ खेळाडू व २५ पंच सहभागी झाले होते. पिंपळे गुरव येथील काळूराम बॅडमिंंटन हॉल येथे या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार व तानाजी जवळकर यांच्या हस्ते पार पडला. मुकेश पवार, प्रदीप शिंदे, हेमंत कोकाटे, गणेश पाटील, सरस्वती भुवनच्या मुख्याध्यापिका जोसफेन जॉर्ज, प्रमोद गायकवाड, राकेश थापा, कविता कांबळे, संदीप जाधव आदी उपस्थित होते.
ओंकार चव्हाण, शिवम मासळकर, श्रीकांत गायकवाड, यश सपकाळ, ओंकार मोहिते, मनीष गुरुषा, सम्यक जाधव, दीपक देशमुख, आविष्कार केदारी, इंद्रनिल शेलार, ओंकार क्षीरसागर, सागर भगत, अक्षय बेल्हेकर, साहिल पोते, जय पार्क यांनी मुलांमध्ये आणि दिव्या सावडणे, समृद्धी तांबे, परी चव्हाण, साक्षी गिरे, सुहानी वाळुंज, अक्षय थिटे, स्वप्नाली घोडके, आरती गजबे, अपूर्वा चाचकर, शेरेल जार्जू, दिव्या जाधव, अनुषा तितिरमारे, रोजी बारवल, इंदिरा रेड्डी, प्रमोदिनी खरात यांनी मुलींच्या गटात सुवर्णपदक मिळविले.
रेहाण नादम, रोनक दुबे, शार्दूल दिवार, दीपक गजबे, ओम पार्क, प्रमोद कांबळे, अभिजित कांबळे, यश सोनियो, अनिष गायकवाड, नील आंबरे, चेतन पाटील, रूपेश निधारे, लोबिनी पॉल, श्रुती भांगे, रिना राव, श्रावणी शिर्के, सुहाणी बेल्लूर, अनमोल सिंग, चंचल आगुतवाल, साक्षी झा, सुप्रिया कांबळे, निवेदिता जाधव, सई मनाकांत, सृृष्टी तांबे, स्रेहा गायकवाड, श्रुती पवार आदींनी रौप्यपदक मिळविले.
बक्षीस वितरणप्रसंगी लक्ष्मण लोखंडे, ललेश बारहाथे, मुख्य आयोजक सुनील साठे, प्रकाश चौधरी, सहादू शेख, रवी मोरे, गणेश धारिवाल यांच्या हस्ते करण्यात आले. (वार्ताहर)