कचरा उचलण्याच्या कराराने महापालिकेची ५० कोटींची बचत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 03:02 IST2018-02-22T03:02:42+5:302018-02-22T03:02:45+5:30
शहरातील कचरा उचलण्याचे व व्यवस्थापनाचे काम दोन ठेकेदारांना आठ वर्षांसाठी देण्याचा प्रस्ताव स्थायी सभेत मंजूर करण्यात आला

कचरा उचलण्याच्या कराराने महापालिकेची ५० कोटींची बचत
पिंपरी : राष्टÑवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या काही नगरसेवकांचा विरोध नोंदवून घेत शहरातील कचरा उचलण्याचे व व्यवस्थापनाचे काम दोन ठेकेदारांना आठ वर्षांसाठी देण्याचा प्रस्ताव स्थायी सभेत मंजूर करण्यात आला. नव्या करारानुसार महापालिकेचे वर्षाकाठी २७ अणि २९ कोटी असा मिळून ५५ कोटी खर्च अपेक्षित आहे. प्रतिटन ११० रुपये वाचणार असल्याने पुढील आठ वर्षांत महापालिकेची सुमारे ५० कोटींची बचत होऊ शकेल, असा दावा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केला. या वेळी अध्यक्षस्थानी सभापती सीमा सावळे होत्या.
घरोघरचा कचरा गोळा करणे, कचरा डेपोपर्यंत त्याची वाहतूक करण्याचे काम दोन ठेकेदारांना देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे होता. शहराचे दोन भागांत विभाजन केले आहे. उत्तर, दक्षिण अशा दोन भागांत कचरा व्यवस्थापनाचे काम ए जी एन्व्हायर्न्मेंट आणि बीव्हीजी या दोन संस्थांना दिले आहे.