शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
5
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
6
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
7
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
8
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
9
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
10
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
11
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
12
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
13
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
14
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
15
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
16
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
19
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
20
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

धक्कादायक ! भुताची भीती दाखवत 4 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2018 11:42 IST

पिंपरीमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे.

पिंपरी चिंचवड -  पिंपरीमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नागसेन परिसरातील ही  घटना आहे. चिमुकलीला भुताची भीती दाखवत तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक माहिती समोर आली आहे. पीडित मुलीला ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी एका तडीपार गुंडास पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे.   या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शहरात लैंगिग अत्याचाराच्या घडणाऱ्या घटनांबाबत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिजलीनगर परिसरात खेळत असणाऱ्या एका चार वर्षीय मुलीला भुताची भीती दाखवत तिला निर्जनस्थळी नेऊन नराधमानं तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. अंगणात खेळणाऱ्या मुलीचा शोध घेण्यासाठी तिचे कुटुंबीय धावपळ करत होते. काही वेळानंतर मुलगी स्वतःहून घरी आली. तिच्या अंगावरील जखमा पाहून पालकांनी तिला याबाबत विचारपूस केली असता,तिने 'भागूचा काका' असे म्हणत घडलेला प्रकार सांगितला.

यानंतर तिला तातडीनं उपचारांसाठी पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी ससून येथे हलवण्यात आले.मुलीने केलेल्या वर्णनावरून पोलिसांनी एका तडीपार गुंडास ताब्यात घेतले असून चिंचवड पोलीस तपास करत आहेत.

(सीरियल रेपिस्ट : कुरेशीच्या गुन्ह्यांचा आलेख वाढताच)

पिंपरीमध्ये 2 अल्पवयीन मुलींवर बलात्कार

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पिंपरीमध्येच चॉकलेटचं आमिष दाखवून दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करण्यात आला होता. यातील एका मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. हिंजवडी परिसरातील ही धक्कादायक आणि संतापजनक घटना होती.  याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली होती. कासारसाई येथील दोन मुली रविवारी मंदिर परिसरात खेळायला गेल्या होत्या. यावेळेस आरोपी गणेश निकम आणि त्याच्या साथीदाराने या दोघींना पाहिले आणि त्यांचा पाठलाग केला. यानंतर दोघांनी मुलींना चॉकलेटचे आमिष दाखवत मंदिरामागील जंगलात नेले आणि बलात्कार केला. घडल्या प्रकाराबाबत कोणाला काहीही सांगितले तर जीवे मारू, अशी धमकी आरोपींनी मुलींना दिला होती.  

त्यामुळे भीतीपोटी दोघींनी कुटुंबीयांना काहीही सांगितले नाही. 18 सप्टेंबरला यातील एका मुलीची प्रकृती खालावल्यानं पालकांनी तिला तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल केले. वैद्यकीय तपासणीदरम्यान मुलीवर बलात्कार झाल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. ही गंभीर आणि हादरवणारी बाब समजल्यानंतर तातडीनं पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. मुलगी बेशुद्धावस्थेत असल्यानं पोलिसांना गुन्ह्याची माहिती मिळवण्यास अडचण निर्माण होत होती. अखेर दुसऱ्या मुलीने धाडस करुन कुटुंबीयांना सर्व काही सांगितले व पोलिसांकडे तक्रार केली. यानंतर दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या होत्या.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार