शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
3
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
4
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
5
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
6
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
7
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
8
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
9
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
10
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
11
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
12
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
13
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!
14
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
15
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
16
Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली
17
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
18
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
19
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
20
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय

४ सुवर्ण, १ रौप्य,१ कांस्य; पिंपरी चिंचवडच्या मुग्धाचा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदकांचा षटकार

By प्रकाश गायकर | Updated: November 21, 2023 15:17 IST

मुग्धाला पुढील काळात भारतासाठी आशियाई क्रीडा स्पर्धा आणि ऑलिंपिकमध्ये पदक जिंकायचे आहे

पिंपरी : गोवा येथे झालेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये मुग्धा वाव्हळ हिने सहा पदक प्राप्त केले आहेत. महाराष्ट्र संघातर्फे खेळताना राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदार्पणातच मुग्धाने सुवर्णपदकाचा चौकार मारला आहे. तिने पेंटाथलॉन खेळात चार सुवर्ण, एक रौप्य व एक कांस्य पदक पटकाविले आहे. 

मुग्धाला मॉडर्न पेंटाथलॉन फेडरेशन ऑफ इंडियाचे सरचिटणीस विठ्ठल शिरगावकर आणि सुनिल पूर्णपात्रे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. मॉडर्न पेंटाथलाॅन क्रीडा प्रकारातील ट्रेट्राथलॉन म्हणजे पोहणे, तलवारबाजी, नेमबाजी व धावणे. या ट्रेट्राथलॉनमध्ये वैयक्तिक, मिक्स रिले ( मयंक चापेकर व मुग्धा वाव्हळ), मुलींचे सांघिक (मुग्धा वाव्हळ, श्रुती गोडसे, अहिल्या चव्हाण) असे तीनही गोल्ड मेडल मुग्धाने जिंकले आहेत. त्याचबरोबर ट्रायथल या क्रीडा प्रकारात धावणे, नेमबाजी, पोहणे यामध्ये तिने वैयक्तिक कांस्यपदक पटकावले आहे. लेझर रन या क्रीडाप्रकारात धावणे व नेमबाजी याचा एकत्र समावेश असतो. आत मुग्धाने सांघिक रौप्य पदक प्राप्त केले आहे. मुग्धाने मॉर्डन पेंटाथलॉन क्रीडाप्रकारातील बायथल, ट्रायथल व लेझर रन या खेळांमधील फेडरेशनच्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धामध्ये २०१७ ते २०२३ दरम्यान सलग ६ वर्षे पदक प्राप्त केलेले आहेत. अभियंता असलेले मुग्धाचे वडील महेश वाव्हळ स्वतःचा व्यवसाय सांभाळून तिच्यासोबत सरावाकडे कटाक्षाने लक्ष देतात. मॉर्डन पेंटाथलॉन खेळाची व योग प्रशिक्षक असलेल्या मुग्धाची आई हर्षदा वाव्हळ याही तिला मार्गदर्शन करतात. पिंपरी चिंचवडमध्ये बारावीमध्ये मुग्धा शिकत आहे. मुग्धाला पुढील काळात भारतासाठी आशियाई क्रीडा स्पर्धा आणि ऑलिंपिकमध्ये पदक जिंकायचे आहे.

टॅग्स :PuneपुणेgoaगोवाSocialसामाजिकWomenमहिलाGold medalसुवर्ण पदकSilverचांदी