शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवड शहरातून ३६ खासगी बसने आठशे परप्रांतीय मजूर मूळगावी रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 21:22 IST

लॉकडाऊन असल्याने परप्रांतीय मजूर, भाविक, पर्यटक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने शहरात अडकले होते.

ठळक मुद्देसामाजिक कार्यकर्ते व संघटना यांच्या माध्यमातून खासगी बसचे नियोजनफिजिकल डिस्टन्सिंग पाळावे, तसेच सॅनिटायझरसह सुरक्षा साधनांचा वापर

पिंपरी : लॉकडाऊन शिथील झाल्यामुळे पिंपरी - चिंचवड शहरात अडकलेल्या मजुरांचा त्यांच्या मूळगावी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून सोमवारपर्यंत ३६ खासगी बसने आठशेवर परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मूळगावी रवाना करण्यात आले आहे. लॉकडाऊन असल्याने परप्रांतीय मजूर, भाविक, पर्यटक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने शहरात अडकले होते. तसेच हजारो स्थलांतरित नागरिक निवारा केंद्रात दाखल झाले होते. आम्हाला आमच्या मूळगावी जाऊ द्या, असा तगादा त्यांनी लावला होता. कामधंदा बंद असल्याने त्यांना रोजगार नाही. त्यामुळे हजारो नागरिक आर्थिक अडचणीत आले. परिणामी त्यांचा धीर सुटला. यातील काही नागरिक रस्त्यावर उतरले. हिंजवडी येथील मजूर दोन वेळा रस्त्यावर आले. गावी सोडण्याची मागणी त्यांनी केली. पोलिसांनी मजुरांची माहिती संकलित केली. तसेच काही सामाजिक कार्यकर्ते व संघटना यांच्या माध्यमातून खासगी बसचे नियोजन केले. ओडिसा, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, जम्मू काश्मीर, बिहार, राजस्थान, तेलंगणा व कर्नाटक या राज्यांत ३६ बसमधून आठशेवर परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मूळगावी रवाना करण्यात आले. 

चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ओडिसा ६, उत्तर प्रदेश २, मध्यप्रदेश २, जम्मू काश्मीर १ अशा ११ बस रवाना करण्यात आल्या आहेत. भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून उत्तर प्रदेश २, जम्मू काश्मीर १ व बिहार २ अशा पाच बस रवाना करण्यात आल्या आहेत. निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून राजस्थान ३ व तेलंगणा २ अशा पाच बस रवाना करण्यात आल्या आहेत. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून कर्नाटकात गुलबर्गा येथे ३ बस रवाना करण्यात आल्या आहेत. चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मध्यप्रदेश येथे दोन बस रवाना करण्यात आल्या आहेत. वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून उत्तर प्रदेश येथे दोन तर तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून राजस्थानात तीन बस रवाना करण्यात आल्या आहेत. बसच्या क्षमतेच्या ५० टक्के प्रवाशांची वाहतूक करण्याची परवानगी पोलिसांकडून देण्यात येत आहे. फिजिकल डिस्टन्सिंग पाळावे, तसेच सॅनिटायझरसह सुरक्षा साधनांचा वापर करून खबरदारीचे आवाहन पोलिसांनी केले आहे. ...........................चाकण व सांगवी येथून आंतरजिल्हा बस चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सोमवारपर्यंत महाराष्ट्रातील विविध भागात २० खासगी बस रवाना झाल्या. तसेच सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून नांदेड व लातूर जिल्ह्यात प्रत्येकी एक अशा दोन खासगी बस सोडण्यात आल्या. त्यानुसार राज्यातील साडेचारशे नागरिकांना खासगी बसने त्यांच्या मूळगावी जाता आले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडTravel Tipsट्रॅव्हल टिप्सCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस