पिंपरी : आंतरराष्ट्रीय ई-गव्हर्नन्स लेखा परीक्षणाबाबतची माहिती घेणेसाठी ३५ देशांच्या प्रतिनिधींनी महापालिकेस भेट दिली.
या वेळी आयुक्त दिनेश वाघमारे, शहर अभियंता अंबादास चव्हाण, मुख्य लेखा परीक्षक पद्मश्री तळदेकर, मुख्य लेखापाल राजेश लांडे, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, सिस्टीम अॅनालिस्ट अनिता कोटलवार, विजय बोरुडे, तसेच किशोर केदारी, प्रकाश बने आदी उपस्थित होते.
इंटरनॅशनल सेंटर इन्फॉर्मेशन सिस्टीम्स अँड आॅडिट ही एक भारतीय महालेखागार यांनी स्थापित केलेली बहुचर्चित संस्था आहे. या संस्थेमार्फत आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध प्रशिक्षण आयोजित केले जाते. या संस्थेमार्फत ३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी या कालावधीत १३४ वे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
भारतातील ई-गव्हर्नन्स प्रकल्प यशस्वीरीत्या राबविलेल्या महापालिकांमध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा समावेश असल्याने सदर संस्थेमार्फत विविध देशातील प्रतिनिधींनी महापालिकेस भेट दिली. त्या वेळी त्यांना चित्रफितीद्वारे महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांची माहिती देण्यात आली.
मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांनी ई-गव्हर्नन्सविषयक कामकाजाबाबत, सुधीर बोराडे यांनी सारथी प्रणालीविषयक माहिती, जितेंद्र जोशी यांनी महापालिकेच्या विविध विभागाकडील उत्पन्न आणि खर्च, तर कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत यांनी स्काडा प्रकल्पाविषयी सादरीकरण दिले. निळकंठ पोमण यांनी सूत्रसंचालन केले, तर आभार पद्मश्री तळदेकर यांनी मानले.
Web Title: 35 Country Representatives paid a visit to Municipal Corporation