शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मावळ लोकसभा निकालासाठी २९ फेऱ्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 13:03 IST

मावळ लोकसभा मतदारसंघाची २३ मेला मतमोजणी होणार आहे.

ठळक मुद्देमतमोजणीसाठी एक फेरी ४५ मिनिटांची, चिंचवड २०, पनवेलसाठी २४ टेबलचा प्रस्तावयावेळी एकूण मतदानापैकी पाच टक्के व्हीव्हीपॅटची मते मोजायची असल्याने अंतिम निकालास रात्र होणार मतमोजणीसाठी आवश्यक मनुष्यबळासह व्यवस्थेसंदर्भात नियोजनमावळ लोकसभा मतदारसंघात १३ लाख ६६ हजार ८१८ मतदारांनी मतदानाचा बजावला हक्क

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघाची २३ मेला मतमोजणी होणार आहे. यावेळी एकूण मतदानापैकी पाच टक्के व्हीव्हीपॅटची मते मोजायची असल्याने अंतिम निकालास रात्र होणार आहे. चिंचवड आणि पनवेल विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर मतदान झाल्याने मतमोजणीसाठी १४ ऐवजी अधिकचे टेबल मांडण्यास मान्यता द्यावी, अशी विनंती मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाºयांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात १३ लाख ६६ हजार ८१८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. मतदारसंघाची मतमोजणी बालेवाडी क्रीडासंकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये होणार आहे. मतमोजणीसाठी आवश्यक मनुष्यबळासह व्यवस्थेसंदर्भात नियोजन केले आहे. लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी होणार आहे. प्रत्येकी १४ टेबलची व्यवस्था केली आहे. एकाच वेळी ८४ मतदान केंद्रांची मतमोजणी झाल्यानंतर फेरीनिहाय निकाल जाहीर होतील. मतमोजणीच्या वेळी संपूर्ण व्हीडिओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळी साडेसहाला विविध राजकीय पक्षांचे उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींसमोर स्ट्राँग रूम उघडण्यात येतील. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सकाळी आठला सुरुवात होईल. सुरुवातीला टपाली मतदानाची मोजणी झाल्यानंतर ईव्हीएमच्या मोजणीला सकाळी साडेआठला सुरुवात होईल.चिंचवडमध्ये २ लाख ८३ हजार ४ मतदारांनी, तर पनवेलमध्ये २ लाख ९८ हजार ३४९ मतदारांनी हक्क बजाविला आहे. १४ टेबलवर मतमोजणी करायची ठरविल्यास चिंचवडसाठी ३४, तर पनवेलसाठी ४२ फेºया होणार आहेत. एका फेरीला ४० ते ४५ मिनिटांचा कालावधी गृहीत धरल्यास मावळ लोकसभेच्या निकालासाठी रात्र होणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅटची मोजणी करायची आहे. मतमोजणीसाठी चिंचवडसाठी २० टेबल, तर पनवेलसाठी २४ टेबल मांडण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. आयोगाने मान्यता दिल्यास विधानसभा मतदारसंघनिहाय फेºया होतील. ....टेबल वाढविल्यास फेºया, वेळ कमी लागणारनिवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतमोजणी कक्षाची रचना केली आहे. विधानसभानिहाय १४ टेबलची मांडणी केली आहे. त्यानुसार सुमारे २५ ते ४२ फेºया होणार आहेत. एका फेरीच्या मोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय दुसरी फेरी सुरू करू नये, असे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. एक फेरी पूर्ण व्हायला साधारणत: ४० ते ४५ मिनिटांचा कालावधी लागणार आहे. .......विधानसभा     मतदान केंद्र्र       झालेले मतदान       फेºया  पनवेल           ५८४             २,९८,३४९     २५चिंचवड             ४७०               २,८३,००४    २४ पिंपरी             ३९९               १,८९,४०४    २९ मावळ             ३६९                २,११,३८३    २७कर्जत             ३४३              १,८९,५७७    २५  उरण            ३३९                १,९५,१०१    २५एकूण             २,५०४            १३,६६,८१८    १५५ बघडलेल्या ईव्हीएमची शेवटी मोजणी४मतदानानंतर इव्हीएमच्या बॅलेट युनिटचे ‘क्लोज’ बटण दाबणे आवश्यक असते. चुकीने हे बटण न दाबल्यास कोणाला किती मते गेली याचा आकडा दिसत नाही. मोजणीच्या दिवशी अशी घटना घडल्यास त्या ईव्हीएम बाजूला काढून ठेवण्यात येतील. सर्व ईव्हीएमची मोजणी झाल्यावर या ईव्हीएममधील क्लोज बटण दाबून त्यातील निकाल जाहीर केला जाणार आहे. मतदानाच्या दिवशी प्रथम मॉक पोल घेतले. मॉक पोलचा डाटा इरेज करणे आवश्यक आहे. काही मतदान केंद्रांवरील मॉक पोलचा डाटा नष्ट केला नाही. याची माहिती आयोगाला देणे बंधनकारक आहे. त्यांच्या आदेशानुसार प्रसंगी या सर्व मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅटची मोजणी करून मते निश्चित होतील.

टॅग्स :PuneपुणेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकmaval-pcमावळVotingमतदान