शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

 पिंपरीत ड्रंक अँड ड्राईव्हचे २०२ खटले दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 16:36 IST

मद्यपान करून वाहन चालवत वाहतूक नियमांचे उल्लंघन

ठळक मुद्देवाहतूक विभाग : मद्यपी वाहनचालकांवर पोलिसांची कारवाईनववर्ष स्वागतासाठी विविध हॉटेल्स, रेस्टॉरन्टतर्फे विशेष पार्ट्यांचे आयोजन वाहतूक पोलिसांनी मुख्य रस्ते, चौक अशा ठिकाणी वाहनचालकांची तपासणी केली.

पिंपरी : सरत्या वर्षाला निरोप देतानाच नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. मात्र असे करताना काही नागरिकांनी मद्यपान करून वाहन चालवून वाहतूक नियमांचे उल्लंघन केले. याप्रकरणी उद्योगनगरीत २०२ खटले दाखल करण्यात आले. पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या वाहतूक विभागातर्फे ही कारवाई करण्यात आली.नववर्ष स्वागतासाठी विविध हॉटेल्स, रेस्टॉरन्टतर्फे विशेष पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले होते. या पार्ट्यांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होत नागरिकांनी सरत्या वर्षाला निरोप देतानाच नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले. या वेळी मद्यपान करून वाहन चालवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे, कायदा व सुव्यवस्थेस बाधा निर्माण करणे, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवडपोलिसांकडून उपाययोजना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार वाहतूक पोलिसांनी मुख्य रस्ते, चौक अशा ठिकाणी वाहनचालकांची तपासणी केली. ब्रिथ अ‍ॅनलायझरचा वापर करून मद्यपान केले आहे किंवा नाही, याची पडताळणी करण्यात आली. यात काही वाहनचालकांनी मद्यपान केल्याचे आढळून आले. त्यांच्यावर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. पोलीस आयुक्तालयांतर्गत सांगवी, हिंजवडी, निगडी, पिंपरी, भोसरी, चिंचवड, चाकण, दिघी-आळंदी, देहूरोड-तळेगाव व तळवडे असे दहा वाहतूक विभाग आहेत. या विभागांत मंगळवारी (दि. ३१) रात्री वाहनांची व चालकांची कसून तपासणी करण्यात आली. या वेळी भोसरी विभागात सर्वाधिक वाहनचालक मद्यपान करून  वाहन चालवित असल्याचे दिसून आले. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करून ३६ खटले दाखल करण्यात आले. तर चाकण विभागात सर्वात कमी केवळ सहा खटले दाखल झाले. 

वाहतूक विभाग        ड्रंक अँड ड्राईव्ह केसेस सांगवी                              १८हिंजवडी                           १८निगडी                            २६पिंपरी                             २७भोसरी                            ३६चिंचवड                          २१चाकण                           ०६दिघी-आळंदी                 ११देहूरोड-तळेगाव             २३तळवडे                           १६एकूण                           २०२

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDrunk And Driveड्रंक अँड ड्राइव्ह31st December party31 डिसेंबर पार्टीPoliceपोलिस