एलईडी दिव्यांमुळे २० टक्के ऊर्जाबचत
By Admin | Updated: May 4, 2016 04:23 IST2016-05-04T04:23:25+5:302016-05-04T04:23:25+5:30
जागतिक ऊर्जादिवसानिमित्त महापालिके ने ऊर्जा बचतीचा उपक्रम हाती घेतला आहे. आतापर्यंत महापालिकेने राबविलेल्या उपक्रमांच्या माध्यमातून एलईडी दिव्यांचा वापर ऊर्जा बचत

एलईडी दिव्यांमुळे २० टक्के ऊर्जाबचत
पिंपरी : जागतिक ऊर्जादिवसानिमित्त महापालिके ने ऊर्जा बचतीचा उपक्रम हाती घेतला आहे. आतापर्यंत महापालिकेने राबविलेल्या उपक्रमांच्या माध्यमातून एलईडी दिव्यांचा वापर ऊर्जा बचत करण्यासाठी केला. या माध्यमातून आतापर्यंत १५ ते २० टक्के ऊर्जा बचत होण्यास मदत झाली आहे, असे सहशहर अभियंता प्रवीण तुपे यांनी सांगितले.
महापालिकेने एलईडी दिवे बसविण्याचे १०० टक्के ऊर्जा बचतीचे लक्ष ठेवले आहे. महापालिकेच्या एकूण इमारतीमध्ये ७६ हजार एलईडी दिव्यांपैकी १६ हजार एलईडी दिवे बसवून झाले आहेत. गतवर्षी एलईडी दिवे बसविण्याचे २२ टक्के काम पूर्ण झाले आहे. शहरातील सर्व क्षेत्रीय कार्यालयामध्ये हे दिवे बसविले गेले आहेत. या वर्षामध्ये एकूण ६१२७ एलईडी दिवे बसविण्याचे काम सुरू आहे. यासाठी एकूण ३.५ कोटी रुपये खर्च येणार आहे. २०१७ पर्यंत ऊर्जाबचतीसाठी एकूण १० हजार दिवे बसविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी ५ कोटींची तरतूद आहे. या माध्यमातून एकूण ५० टक्के ऊर्जा बचत होणार आहे, असे तुपे यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
महापालिक ा विद्युत विभागाचा १७०० मीटर बेस्ट लाइन बसविण्याचा प्रयत्न आहे. या माध्यमातून वाढलेली वीज बिले, तसेच झालेली बचत लक्षात येईल. तसेच सौरऊर्जा, जलशुद्धीकरण केंद्रातील पॉवर फॅ क्टरमुळे ऊर्जा बचतीस मदत झाली आहे. भविष्यात असे उपक्रम राबविण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. याशिवाय एनर्जी आॅडिटमधूनही काही मुद्दे निष्पन्न होतील या माध्यमातून कोणती पावले उचलण्याची गरज आहे, हे लक्षात येईल.
- प्रवीण तुपे, सहशहर अभियंता