रावेत बंधाऱ्यात बुडून १५ वर्षीय मुलाचा मृत्यू
By नारायण बडगुजर | Updated: January 20, 2025 21:55 IST2025-01-20T21:54:33+5:302025-01-20T21:55:03+5:30
घटनेची माहिती मिळताच पोलिस व पिंपरी-चिंचवड महापालिका अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.

रावेत बंधाऱ्यात बुडून १५ वर्षीय मुलाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पवना नदीतू बुडून १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. रावेत बंधारा येथे सोमवारी (दि. २०) दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली.
स्वप्नज सुधीर महाडिक (१५, रा. यमुनानगर, निगडी) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. रावेत पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन फटांगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नज हा निगडी येथील एका शाळेत दहावी इयत्तेत शिकत होता. सोमवारी दुपारी तो दोन मित्रांसह पोहण्यासाठी पवना नदीच्या रावेत बंधारा येथे आला होता. पोहताना तो बुडाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस व पिंपरी-चिंचवड महापालिका अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याचा नदीच्या पाण्यात शोध घेतला. रात्री त्याचा मृतदेह मिळाला. पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात मृतदेह हलविण्यात आला. रावेत पोलिस तपास करीत आहेत.