प्रभागाध्यक्षासाठी१४ जणांचे अर्ज

By Admin | Updated: March 30, 2016 02:08 IST2016-03-30T02:08:51+5:302016-03-30T02:08:51+5:30

महापालिकेच्या सहा क्षेत्रीय कार्यालयांच्या प्रभाग अध्यक्षपदासाठी केवळ १४ नगरसेवकांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रसकडे अर्ज केला आहे.

14 applications for the post of Vice President | प्रभागाध्यक्षासाठी१४ जणांचे अर्ज

प्रभागाध्यक्षासाठी१४ जणांचे अर्ज

पिंपरी : महापालिकेच्या सहा क्षेत्रीय कार्यालयांच्या प्रभाग अध्यक्षपदासाठी केवळ १४ नगरसेवकांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रसकडे अर्ज केला आहे.
महापालिकेच्या अ, ब, क, ड, इ व फ या सहाही क्षेत्रीय कार्यालयांच्या प्रभाग अध्यक्षांची मुदत संपली आहे. ६ एप्रिलला नवीन प्रभाग अध्यक्षांची निवड होणार आहे.
‘अ’ प्रभागाक्षपदासाठी सुजाता टेकवडे, नीलेश पांढारकर, वैशाली काळभोर हे तिघे जण इच्छुक आहेत. ‘ब’ प्रभागातून छाया साबळे या एकमेव इच्छुक आहेत. ‘क’ प्रभाग अध्यक्षपदासाठी अमिना पानसरे, रोहित काटे, जितेंद्र ननावरे, शैलजा शितोळे, सुषमा तनपुरे यांचा समावेश आहे. ‘ड’ प्रभागासाठी अरुण टाक, तर ‘इ’ प्रभागासाठी श्रद्धा लांडगे हे एकमेव इच्छुक आहेत. ‘फ’ प्रभागात अध्यक्षपदासाठी शुभांगी बोऱ्हाडे, साधना जाधव, मंदाकिनी ठाकरे यांनी अर्ज केले आहेत. (वार्ताहर)

Web Title: 14 applications for the post of Vice President