शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

तीन वेगवेगळ्या गुन्ह्यात २.११ कोटींची फसवणूक करणाऱ्या ११ जणांना अटक

By नारायण बडगुजर | Updated: June 18, 2025 18:59 IST

डिजिटल अरेस्ट करण्याची भीती दाखवून एकाला ५२ लाख ५९ हजार रुपयांना फसवल्याची घटना उघडकीस आली

पिंपरी : डिजिटल अरेस्ट, शेअर बाजारात गुंतवणूक आणि डेटिंग ॲपवर लग्नाचे आमिष दाखवून तीन गुन्ह्यांत २.११ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी ११ संशयितांना दादरा नगर हवेली, सोलापूर, धाराशिव, अहिल्यानगर, पुणे विमानतळ येथून अटक केली.गुंतवणुकीच्या बहाण्याने फसवणूक, चौघांना अटकपिंपरी-चिंचवडमधील एकाला शेअर मार्केटमध्ये आयपीओ खरेदीमध्ये गुंतवणूक केल्यास फायदा होईल, असे आमिष दाखवून ३.३० लाख रुपयांची फसवणूक झाली होती. यातील २.१० लाख रुपये सिल्वासा, दादरा व नगर हवेली येथील बँक खात्यावर गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दादरा व नगर हवेली येथून सलमान रफिक खान (३२), बंटी रमेशभाई पांचाळ (३०), इंतकाफ इद्रीस खान (३६), सुरज कृष्णा सिंग (३४, दादरा व नगर हवेली) यांना अटक केली.दीड कोटींची फसवणूक करून नेपाळला पळालेल्या तिघांना अटकडेटिंग ॲपवर लग्नाचे आमिष दाखवून महिलेकडून एक कोटी ५५ लाख रुपये घेण्यात आले. पैसे घेण्यासाठी संशयितांनी घर खरेदी, ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक अशी कारणे सांगितली. पोलिसांनी सोलापूर येथे जाऊन अमित अशोक एकबोटे याच्याकडे चौकशी केली. त्याचे बँक खाते गेमिंगसाठी वापरले जाणार असल्याचे सांगणाऱ्या शुभम चंद्रकांत मंथा (२५), स्वप्नील चंदुलाल बाहेती (३५), प्रशिक उत्तम नवघरे (२६, सोलापूर) यांना अटक केली. हे तिघे पाटणामार्गे नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होते. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून त्यांना अटक केली. संशयित स्वप्नील आणि शुभम हे चीन येथील सायबर गुन्हेगारांच्या संपर्कात आहेत.डिजिटल अरेस्टची भीती दाखवून ५२.५९ लाखांची फसवणूकडिजिटल अरेस्ट करण्याची भीती दाखवून एकाला ५२ लाख ५९ हजार रुपयांना फसवल्याची घटना उघडकीस आली. पोलिसांनी सुरुवातीला दोघांना अहिल्यानगर येथून अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केली असता संशयित विशाल पालवे लोकांकडून बँक खात्याचे डिटेल्स घेऊन त्यावर फसवणुकीतील पैसे घेत होता. ते पैसे क्रिप्टो वॉलेटला युएसडीटीमध्ये रूपांतरण करून घेत होता. पोलिसांनी त्याला अटक केली. नऊ मोबाईल फोन, २३ बँक खात्याचे पासबुक, १८ बँक खात्यांचे चेकबुक, ३५ डेबिट कार्ड, ६४०० रुपये रोख रक्कम असा एकूण एक लाख १६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याच्यासह अक्षय सदाशिव गळवे आणि मयूर सुनील आणेचा यांनाही अटक करण्यात आली.पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक निरीक्षक प्रवीण स्वामी, उपनिरीक्षक सागर पोमण, वैभव पाटील, प्रकाश कातकाडे, विद्या पाटील यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcyber crimeसायबर क्राइम