शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

108 सेवा ‘वेट अ‍ॅण्ड वॉच!’ शासकीय रुग्णवाहिका : महामार्गावर तत्पर; शहरात मात्र ढिम्म  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 03:30 IST

अपघातस्थळी तातडीची वैद्यकीय सेवा मिळणे अत्यंत गरजेचे असते. अपघात घडल्यानंतर काही वेळातच रुग्णावर उपचार सुरू झाले, तर जखमी रुग्णाचे प्राण वाचू शकतात. याच उद्देशाने राज्य शासनाने वैद्यकीय उपकरणे, तसेच डॉक्टर अशी यंत्रणा सज्ज असलेल्या रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत.

पिंपरी : अपघातस्थळी तातडीची वैद्यकीय सेवा मिळणे अत्यंत गरजेचे असते. अपघात घडल्यानंतर काही वेळातच रुग्णावर उपचार सुरू झाले, तर जखमी रुग्णाचे प्राण वाचू शकतात. याच उद्देशाने राज्य शासनाने वैद्यकीय उपकरणे, तसेच डॉक्टर अशी यंत्रणा सज्ज असलेल्या रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत. १०८ क्रमांकाची रुग्णवाहिकेसाठीची ही टोल फ्री सुविधा वापरात कशी येते, ख-या अर्थाने या रुग्णवाहिका अपघातस्थळी वेळेत पोहोचतात का, रुग्णांना या सेवेचा कितपत फायदा होतो, हे तपासण्यासाठी ‘लोकमत टीम’ने पिंपरी-चिंचवड शहर व मावळ तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी स्टिंग आॅपरेशन केले. त्या वेळी आलेले अनुभवही वेगवेगळे होते.दुपारी एकची वेळ... नाशिक फाटा, कासारवाडी येथील उड्डाणपुलाखाली अपघात झाल्याची माहिती मोबाइलवरून १०८ क्रमांकावर कळवली. एका महिलेने फोन उचलला. जवळच रुग्णवाहिकेत वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर आहेत, त्यांना फोन जोडून देते, त्यांच्याकडून मदत मिळेल, असे सांगण्यात आले. त्यांना फोन जोडून दिल्यानंतर त्यांनी चक्क २० ते २५ मिनिटे रुग्णवाहिकेची वाट पाहावी लागेल, असे सांगितले. त्यानुसार प्रतीक्षा केलीअसता, २२ मिनिटांनी घटनास्थळी रुग्णवाहिका पोहोचली. इमर्जन्सी नव्हे, ही तर वेटिंग सेवा आहे, असा अनुभव ‘लोकमत’ टीमला ‘स्टिंग आॅपरेशन’च्या निमित्ताने आला.औंध येथे १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकांचे व्यवस्थापन (मॉनिटरिंग) केले जाते. त्यामुळे सात ते आठ किलोमीटरच्या अंतरावर शहरात ही सेवा सहज उपलब्ध होणे अपेक्षित आहे. मात्र कासारवाडी, नाशिक फाटा, भूमकर चौक, वाकड या ठिकाणी रुग्णवाहिका येण्यासाठी २० ते २५ मिनिटांची प्रतीक्षा करावी लागली आहे. याउलट मावळातील लोणावळा ते देहूरोड आणि निगडी मार्गावर मात्र ही रुग्णवाहिका कधी सहा मिनिटांच्या कालावधीत, तर कधी दहा मिनिटांच्या आत पोहोचली आहे. ‘सेवा पुरविणारी संस्था एकच असूनही सेवेत फरक कसा?’ असा मुद्दा उपस्थित झाला आहे.खासगी रुग्णालयांशी लागेबांधे?ग्रामीण भागात महामार्गावर तातडीने ही सेवा उपलब्ध होते, याउलट शहरात मात्र ही सेवा ढिम्म आहे. या मागील कारण शोधण्याचा प्रयत्न केला, तर या रुग्णवाहिका सेवेची यंत्रणा काही खासगी रुग्णालयांना अप्रत्यक्षपणे संलग्न असल्याचे जाणवते. किवळे परिसरात ‘लोकमत’ वार्ताहराने १०८ क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिका मिळावी, अशी मागणी केली. काही क्षणांतच त्या वार्ताहरास जवळच्या खासगी रुग्णालयातून फोनवर संपर्क साधण्यात आला. रुग्णालयाचे या यंत्रणेशी संगनमत असल्याचे संकेत त्यातून मिळाले.भोसरीमध्ये तातडीच्या सेवेला विलंब भोसरी : येथील मंगळवारी सकाळी सव्वाअकराची वेळ. स्थळ अंकुशराव लांडगे नाट्यगृहासमोर एका माणसाला तातडीची सेवा मिळण्यासाठी १०८ ला फोन केला. सेवा केंद्रातून ताबडतोब प्राथमिक माहिती घेतली गेली. जवळपास अ‍ॅम्ब्युलन्स कुठे आहे, बघून कळवतो, असे सांगण्यात आले. एकाच मिनिटानंतर फोन आला. भोसरी व परिसरात अ‍ॅम्ब्युलन्स आता उपलब्ध नाही. परंतु, पाठवतो असे सांगण्यात आले. त्यानंतर तब्बल एक तासाने साधारण सव्वाबारा वाजता गाडी आली. एका तासाने जर अपघातग्रस्ताला १०८ क्रमांकाकडून मदत मिळणार असेल, तर रुग्ण अडचणीत येण्याचा धोका आहे.वैद्यकीय मदतीसाठी महाराष्ट्र शासनातर्फे चालवण्यात येणाºया १०८ या अ‍ॅम्ब्युलन्सची सेवा खरेच नागरिकांना व्यवस्थित मिळते का? या साठी लोकमतच्या टीमने मंगळवारी शहरात ठिकठिकाणी स्टिंग आॅपरेशन केले. त्या वेळी हा प्रकार पुढे आला. १०८ क्रमांकावर तातडीने प्रतिसाद मिळतो. मात्र, गाडी शोधणे ती पाठवणे यामध्ये खूप वेळ जात असल्याचे दिसून आले. घटना घडली, त्या ठिकाणी व जवळपास गाडी उपलब्ध होत नाही. त्यामुळे तातडीच्या सेवेसाठी नागरिकांना व अपघातग्रस्तांना ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ करावे लागते.यामुळे टाळली जाते मदत कोणी १०८ला कॉल केला आणि ती व्यक्ती संबंधित रुग्णाला ओळखत नसली, तरी त्या व्यक्तीला रुग्णालयात यावे लागते, असे १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेमधील डॉक्टरांनी सांगितले. रुग्णालयात येऊन फक्त माहिती देऊन जावे लागते.अनोळखी रुग्ण असला, तरीही ज्या व्यक्तीने कॉल केला होता, तिला त्या रुग्णासोबत हॉस्पिटलपर्यंत जावे लागते. त्यामुळे नागरिक मनस्ताप होईल या भीतीपोटी अनेक वेळा मदत करण्याचे टाळत असल्याचे दिसून येत आहे.महामार्गावर तातडीची सेवा लोणावळा : अवघ्या १३ मिनिटांत पोहोचली रुग्णवाहिकालोणावळा : पुणे- मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ येथील लोणावळा महाविद्यालय परिसरातून १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला फोन केला. मंगळवारची सकाळी १० वाजून ३८ मिनिटांची वेळ होती. अवघ्या १३ व्या मिनिटांला घटनास्थळी १० वाजून ५१ मिनिटांत गाडी पोहोचली.लोणावळा महाविद्यालयासमोरील अपघाताची माहिती दिल्यानंतर १०८ च्या कॉल सेंटरला एका मुलीने फोन घेत तो कुसगाव आयआरबी कार्यालयाजवळ असलेल्या रुग्णवाहिकेतील डॉक्टर यांना जोडून दिला. त्यांना माहिती दिल्यानंतर तातडीने प्रतिनिधींच्या फोनवर मेसेज आला. त्यामध्ये कोणती गाडी या ठिकाणी येत आहे. त्या गाडीचा क्रमांक व संपर्कासाठी गाडीतील वैद्यकीय अधिकारी यांचा मोबाईल नंबर याचा समावेश होता. फोननंतर १३ मिनिटांनी रुग्णवाहिका क्र. (एमएच १४, सीएल- ०७९९) घटनास्थळी दाखल झाली. गाडीमध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप वानखेडे होते.वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप भीमराव वानखेडे व चालक उमेश शांताराम गोसावी म्हणाले, अपघाताचा फोन आल्यानंतर शक्य तितक्या लवकर आम्ही घटनास्थळी पोहचण्याचा प्रयत्न करतो. कुसगाव येथील आयआरबी कार्यालयाजवळ आमची गाडी उभी असते. काही वेळा वाहतूक कोंडीमुळे घटनास्थळी पोहचण्यास उशीर होतो़ मात्र आम्ही तातडीने पोहचण्याचा प्रयत्न करतो. रुग्णवाहिका ही ऐएलएस प्रकारची असून गाडीत कार्डीयाक सुविधा उपलब्ध आहे. ईसीजी सेक्शन आहे. ४० विविध प्रकारची औषधे व हायजिनिक साहित्य गाडीत उपलब्ध आहेत. अपघातस्थळी गेल्यानंतर रुग्णावर तातडीने गाडीत प्राथमिक उपचार करुन त्यांना जवळच्या शासकीय अथवा खासगी रुग्णालयात दाखल केले जाते. रुग्णाची परिस्थिती पाहून तो निर्णय घेतला जातो. गाडीमधील औषधांबाबत दर महिन्याला वरिष्ठ कार्यालयाकडे चेकलिस्ट दिली जाते, त्याप्रमाणे नव्याने औषधे गाडीत ठेवली जातात. २४ तासांत किती अपघात कॉल झाले, याची दैनंदिन माहिती कार्यालयाला दिली जाते व गाडीतील मस्टरमध्ये त्याच्या नोंदी केल्या जातात, असे डॉक्टरांनी सांगितले.द्रुतगतीवर ५ रुग्णवाहिका सज्ज५ जुलै २०१४ सालापासून १०८ क्रमांकाची सेवा सुरु झाली तेव्हापासून आम्ही या भागात काम करत आहोत. मावळात आठरुग्णवाहिका असून त्यापैकी तीन गाड्या द्रुतगती मार्गावर दस्तुरी, सिंहगड कॉलेज व उर्से टोलनाका याठिकाणी तर जुन्या हायवेवर कार्ला, कामशेत, वडगाव, तळेगाव व देहूरोड या ठिकाणी पाच गाड्या असतात. एखादी गाडी कॉलवर गेली, असल्यास दुसरी घटना घडली तर तातडीने दुसरी गाडी घटनास्थळी पाठवली जाते.दुर्गम भागात आवश्यकतामावळ तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पाहता मावळात आठ रुग्णवाहिका कमी पडत आहेत. त्यात एखादी गाडी तांत्रिक अडचणीमुळे बंद पडल्यास अडचणीत वाढ होत असल्याने गाड्यांची संख्या वाढवावी. हायवेवर अपघात झाल्यास रुग्णवाहिका वेळेवर पोहचते; मात्र तोच अपघात ग्रामीण भागात तसेच दुर्गम ठिकाणी झाल्यास रुग्णवाहिका पोहचण्यास विलंब लागतो, असे नागरिकांचे म्हणणे आहे.मावळ तालुक्यात आंबवणे, येळशे, काले कॉलनी ही प्राथमिक आरोग्य केंद्र दूर अंतरावर असल्याने त्याठिकाणी रुग्णवाहिका पोहोचण्यास उशीर होतो. मावळात रुग्णवाहिकांची संख्या तसेच वैद्यकीय अधिकारी यांची संख्या वाढविण्याची गरज आहे. अधिकारी संख्या मर्यादित असल्याने वैद्यकीय अधिकारी सुटीविना अविरत काम करत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.रुग्णवाहिका : असून अडचण...रहाटणी : एखादा अपघात झाला, तर त्या व्यक्तीस तातडीने सर्व सुविधा मिळण्यासाठी १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, ही सेवा उपलब्ध होण्यास २५ ते ३० मिनिटांचा कालावधी लागत असल्याचा अनुभव वाकड येथील भूमकर चौकांत स्टिंग आॅपरेशनवेळी लोकमत टीमला आला. त्यामुळे केवळ १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका असून खोळंबा असल्याची परिस्थिती दिसून येत आहे.वाकड येथील भूमकर चौकात तातडीची सेवा हवी आहे, असा १०८ क्रमांकावर दुपारी १.४५ ला फोन करण्यात आला. त्या वेळी एका महिला कर्मचाºयाने फोनवरून सर्व माहिती घेतली, तसेच संबंधित डॉक्टरांशी फोन जोडून दिला. आम्ही त्यांना स्थळाची माहिती दिली. त्यांनी १५ मिनिटांत येण्याचे आश्वासन दिले. प्रत्यक्षात रुग्णवाहिका तब्बल २८ मिनिटांनी भूमकर चौकात पोहोचली. अशा पद्धतीने तातडीची सेवा उशिरा मिळत असेल, तर अशा सेवेचा फायदाच काय? या ठिकाणी खरेच एखादा अपघात झाला असता, तर ही शासनाची सेवा मिळालीच नसती. 

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्य