पालिकेतर्फे १०६ महिलांना अर्थसाहाय्य

By Admin | Updated: April 24, 2016 04:26 IST2016-04-24T04:26:42+5:302016-04-24T04:26:42+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने एक किंवा दोन मुलींवर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या महिलेस अर्थसाहाय्य दिले जाते. या योजनेंतर्गत सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात

106 women contributed by the corporation | पालिकेतर्फे १०६ महिलांना अर्थसाहाय्य

पालिकेतर्फे १०६ महिलांना अर्थसाहाय्य

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने एक किंवा दोन मुलींवर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या महिलेस अर्थसाहाय्य दिले जाते. या योजनेंतर्गत सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात १०९ पात्र महिलांना अर्थसाहाय्य दिले जाणार आहे.
महापालिकेच्या महिला व बालकल्याण योजनेंतर्गत एका मुलीवर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या महिलेस पंचवीस हजार, तर दोन मुलींवर शस्त्रक्रिया करणाऱ्या महिलेस दहा हजार रुपये अर्थसाहाय्य दिले जातात. या योजनेचा शहरातील महिलांनी लाभ घेतला आहे.
मागील आर्थिक वर्षात १०९ महिलांपैकी ६७ महिलांना अर्थसाहाय्याचे वाटप झाले आहे. तर उर्वरित ४२ लाभार्थींनी नागरवस्ती विकास योजना विभाग येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या योजनेचे अर्ज महापालिकेच्या सतरा नागरी सुविधा केंद्रात विनामूल्य उपलब्ध होत असल्याची माहिती समाजविकास अधिकारी संभाजी ऐवले यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: 106 women contributed by the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.