Travel : अवघ्या ३ दिवसात फिरता येईल 'हा' सुंदर देश; भारताचे १०००० होतील तब्बल ५८०००! फिरण्यासाठी बेस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 18:22 IST
1 / 8भारतात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात एकदा तरी विदेशात फिरायला जाण्याची इच्छा असतेच! ज्यांना फिरायला आवडते, अशा प्रत्येक व्यक्तीला एकदा तरी परदेशात जायचे असते. फॉरेन ट्रिपची मजाच काही और असते! कधी कधी पैसे-बजेट असूनही लोक आंतरराष्ट्रीय प्रवासाचे नियोजन करू शकत नाहीत. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे सुट्ट्या. परदेशात जाण्यासाठी किमान ७ दिवसांचा वेळ लागतो, पण कधीकधी इतक्या सुट्ट्या मिळणे सोपे नसते.2 / 8पण, जर तुम्हाला लाँग वीकेंड मिळत असेल, तर तुम्ही परदेश प्रवासाची योजना अगदी सहज करू शकता. कारण, तीन दिवसांच्या सुट्टीसाठी कझाकिस्तान एक उत्कृष्ट पर्याय असू शकतो. एवढेच नाही, तर कझाकिस्तानला जाण्यासाठी दिल्ली आणि मुंबईहून थेट विमाने उपलब्ध आहेत.3 / 8जर, तुम्ही देखील तीन दिवस फिरण्यासाठी कझाकिस्तानला जाण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला ट्रान्झिट व्हिसा मिळू शकतो. हा व्हिसा जारी करण्यापूर्वी तुमच्याकडे ७२ तासांच्या आत कझाकिस्तानमधून भारतात परत येण्याची तिकीट असणे आवश्यक आहे.4 / 8कझाकिस्तान आपल्या नावाप्रमाणेच मनोरंजक आणि सुंदर आहे. हा एक असा देश आहे जो फिरण्यासाठी खूप स्वस्त आणि चांगला आहे. इतकेच नव्हे, तर येथील चलन खूप स्वस्त आहे. भारताचे १०००० रुपये हे या देशात जाऊन तब्बल ५८२७० टेंगे होतात. या देशात तुम्हाला ९० रुपयांपेक्षा कमी किमतीत उत्कृष्ट आणि स्वादिष्ट बर्गर मिळू शकेल. नाइटलाइफची आवड असणाऱ्या लोकांसाठी कझाकिस्तान स्वर्गाहून कमी नाही.5 / 8कझाकिस्तान जगातील नववा सर्वात मोठा आणि जगातील सर्वात लांब सीमा असलेला देश आहे. येथे काही न पाहिलेले नैसर्गिक सौंदर्य आहे, ज्यामुळे पर्यटकांचा प्रवास अनोखा बनतो. येथे तुम्हाला दऱ्या-डोंगर, तलाव, इतिहास आणि संस्कृती जवळून अनुभवण्याची संधी मिळते.6 / 8कझाकिस्तानमधील अल्माटी तलाव खूप सुंदर आहे. अल्माटी कझाकिस्तानच्या दक्षिण भागात आहे. दिल्लीतून तीन तासांच्या थेट उड्डाणानंतर तुम्ही इथेच पोहोचता. हा समुद्रसपाटीपासून २५११ मीटर उंचीवर आहे, ज्याचा उपयोग जल-विद्युत ऊर्जा तसेच अल्माटी शहराच्या पाण्याच्या स्रोतासाठी केला जातो.7 / 8कझाकिस्तान एक स्वतंत्र देश राहावा यासाठी पॅनफिलोव्हच्या २८ गार्ड्सनी खूप निर्णायक भूमिका बजावली आहे. या जागेचे स्वतःचे ऐतिहासिक महत्त्व आहे. पॅनफिलोव्हच्या या पार्कमधील पुतळा, अनंत ज्योत आणि इतर शिल्पे आजही त्यांच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या अंतिम बलिदानाची निरंतर आठवण करून देतात.8 / 8या देशातील 'कोक टोबी' एक टेकडी आहे. येथे जाण्यासाठी केबल कार सर्वात सोपा मार्ग मानला जातो. कोक-टोबे हिलसाठी केबल कारची सफर केल्यानंतर तुम्ही लोकल स्टॉल-रेस्टॉरंट्स आणि एका लहान प्राणिसंग्रहालयाचा आनंद घेऊ शकता.