Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 19:52 IST
1 / 7तुम्ही नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी परदेशात जाण्याचा विचार करत असाल, पण बजेट कमी असल्यामुळे चिंतेत आहात? तर काळजी करू नका! कारण जगात असे अनेक देश आहेत जे सुंदर असण्यासोबतच खूप स्वस्त आहेत. या देशांमध्ये राहणे, खाणे आणि फिरणे खूपच परवडणारे आहे.2 / 7चला तर मग, अशा ५ बजेट-फ्रेंडली परदेशी ठिकाणांबद्दल जाणून घेऊया, जिथे तुम्ही अवघ्या ₹५०,००० ते ₹१ लाखाच्या खर्चात नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनचा आनंद घेऊ शकता.3 / 7भूतान : लँड ऑफ हॅपिनेस म्हणजेच भूतानमध्येही तुम्ही नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनचा प्लॅन करू शकता. शांतता आणि नैसर्गिक सौंदर्याच्या कुशीत वसलेले हे ठिकाण खूप बजेट-फ्रेंडली आहे. भारतीयांना येथे जाण्यासाठी व्हिसाची आवश्यकता नसते, ज्यामुळे ही ट्रिप अजून स्वस्त होते. भूतानला भेट देऊन तुम्ही थिम्फू, पारो आणि पुनाखा यांसारख्या ठिकाणांचा शोध घेऊन नवीन वर्षाचा पुरेपूर आनंद घेऊ शकता.4 / 7श्रीलंका : 'आइलंड ऑफ जेम्स' या नावाने प्रसिद्ध असलेला भारताचा हा शेजारी देश खूप सुंदर आणि नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी खूपच स्वस्त आहे. येथील समुद्रकिनारे, प्राचीन मंदिरे आणि अनेक नैसर्गिक ठिकाणे तुमचा प्रवास अविस्मरणीय बनवू शकतात. कोलंबो, कँडी आणि गॉल यांसारख्या शहरांमध्ये प्रत्येक क्षण खास असतो. श्रीलंकेतील एला रॉक, सिगिरिया रॉक आणि याला नॅशनल पार्कला भेट देणे एक चांगला अनुभव देईल. स्थानिक खाद्यपदार्थ, वाहतूक आणि हॉटेल्स येथे खूप परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत.5 / 7थायलंड : भारतीय पर्यटकांच्या आवडत्या ठिकाणांमध्ये थायलंडमधील बँकॉक, फुकेत आणि पटाया यांसारख्या शहरांचा समावेश आहे. या ठिकाणी जाऊन तुम्ही नवीन वर्षाचे सेलिब्रेशन अविस्मरणीय बनवू शकता. येथील स्ट्रीट फूड, नाईट मार्केट्स आणि बीच पार्टीज तुमच्या ट्रिपचे प्रमुख आकर्षण ठरतील. भारतीयांसाठी थायलंडचा व्हिसा ऑन अरायव्हल उपलब्ध आहे, ज्यामुळे प्रवासाची प्रक्रिया सोपी होते. येथे हॉटेल्स आणि खाद्यपदार्थ खूपच बजेट-फ्रेंडली आहेत.6 / 7इंडोनेशिया : नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी इंडोनेशियामध्ये खास करून बाली हे सर्वोत्तम ठिकाण मानले जाते. पर्यटक येथील समुद्रकिनारे, मंदिरे आणि धबधबे यांचा खूप आनंद घेतात. येथे अनेक बजेट रिसॉर्ट्स आणि होमस्टे उपलब्ध आहेत. जगभर प्रसिद्ध असलेले स्थानिक खाद्यपदार्थही खूप स्वस्त दरात मिळतात.7 / 7व्हिएतनाम : जर तुम्हाला इतिहास, संस्कृती आणि कला आकर्षित करत असेल, तर नवीन वर्षाच्या निमित्ताने तुम्ही व्हिएतनामला नक्कीच भेट द्या. येथील हो ची मिन्ह सिटी, हनोई आणि हा लाँग बे यांसारखी ठिकाणे खूप मनोरंजक आहेत. स्थानिक खाद्यपदार्थ आणि कमी खर्चाच्या वाहतूक सेवांमुळे तुमचा संपूर्ण प्रवास कमी बजेटमध्ये पूर्ण होऊ शकतो.