Travel : लग्नानंतर मालदीवला फिरायला जायचा प्लॅन करताय? राहणं, खाणं आणि फिरण्यासाठी किती खर्च येईल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 15:54 IST
1 / 7'समुद्रावरील स्वर्ग' म्हणून ओळखले जाणारे मालदीव हे ठिकाण फिरायला कोणाला आवडणार नाही? निळेशार पाणी, शांत किनारे आणि सुंदर व्हिलामुळे मालदीव हे आता भारतीय पर्यटकांचे आवडते डेस्टिनेशन बनले आहे. हनिमून कपल्ससाठी तर हे ठिकाण म्हणजेच स्वर्गच आहे.2 / 7मालदीवची ट्रिप म्हणजे खूपच खर्चिक असेल, असा अनेकांचा समज असतो, पण योग्य नियोजन केले तर अगदी कमी बजेटमध्येही तुम्ही या बेटांना भेट देऊ शकता. लग्नानंतर जोडीदारासोबत मालदीवला जायचा विचार करत असाल, तर ५ दिवसांच्या स्वप्नवत प्रवासाचे संपूर्ण बजेट आणि खर्चाचे गणित काय असेल, जाणून घेऊया... 3 / 7मालदीवची राजधानी 'माले' येथील विमानतळावर पोहोचणे हे प्रवासातील पहिले पाऊल आहे. मुंबई ते माले विमानाचे येण्या-जाण्याचे तिकीट दोन व्यक्तींसाठी साधारण ७०००० रुपये इतके असू शकते. फ्लाईटचे भाडे हंगामानुसार कमी-जास्त होत असते. त्यामुळे वेळेवर बुकिंग करणे फायद्याचे ठरते. काही काळ आधीच बुकिंग केल्यास तिकीट आणखी स्वस्त देखील मिळू शकते.4 / 7मालदीवमध्ये राहण्याचा खर्च बजेटमध्ये ठेवायचा असेल, तर तुम्ही महागड्या रिसॉर्ट्सऐवजी होम स्टे निवडू शकता. दोघांसाठी एका रात्रीचा होम स्टे खर्च साधारण ₹ ६,००० ते ₹ ७,००० असू शकतो. म्हणजेच ५ दिवसांच्या मुक्कामाचा एकूण खर्च अंदाजे ₹ ३०,००० पर्यंत येऊ शकतो. मात्र, जर तुम्ही होम स्टेऐवजी थ्री स्टार, फाईव्ह स्टार हॉटेल किंवा वॉटर व्हिला निवडले, तर तुमच्या राहण्याचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढेल.5 / 7मालदीवमध्ये जेवण थोडे महागडे असू शकते. त्यामुळे योग्य ठिकाणी खाणे महत्त्वाचे आहे. खाण्यापिण्यावर एका व्यक्तीला दिवसाकाठी सुमारे ₹ ६,००० पर्यंत खर्च येऊ शकतो. म्हणजेच दोघांच्या ५ दिवसांच्या जेवणाचा एकूण खर्च अंदाजे ₹ ५०,००० ते ₹ ६०,००० पर्यंत येऊ शकतो. हॉटेलमध्ये जेवण महाग असू शकते, परंतु स्थानिक ठिकाणी जेवण केल्यास तुमचा खर्च थोडा कमी होईल.6 / 7मालदीवमध्ये अनेक सुंदर ठिकाणे आहेत, पण काही खास ठिकाणे तुमच्या ट्रिपला अधिक रोमांचक बनवतील. माफुशी आयलंड हे बेट पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. येथे तुम्ही कयाकिंग, स्कूबा डायव्हिंग आणि स्नॉर्कलिंग यांसारख्या वॉटर स्पोर्ट्सचा तसेच नाईट फिशिंगचा थरार अनुभवू शकता.7 / 7मालदीवच्या प्रवासातील सर्वात खास अनुभव म्हणजे वॉटर व्हिलात राहणे. पाण्यावर बांधलेल्या या आलिशान व्हिलामध्ये राहून तुम्ही तुमच्या ट्रिपचा आनंद द्विगुणित करू शकता. योग्य वेळी फ्लाईट बुकिंग आणि होम स्टेची निवड केल्यास, कुटुंबासह ५ दिवसांच्या मालदीव ट्रिपचा किमान अंदाजित खर्च ₹ १.७ लाख ते ₹ २.२ लाखपर्यंत येऊ शकतो.