Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 19:54 IST
1 / 7जेव्हा आंतरराष्ट्रीय बेटांच्या पर्यटनाचा विचार येतो, तेव्हा आपल्या मनात सर्वात आधी मालदीव किंवा अंदमान-निकोबारचा विचार येतो. पण जगात अनेक सुंदर बेटे आहेत, जी अजूनही फारशी एक्सप्लोर झालेली नाहीत. जर तुम्ही फिरण्याचे शौकीन असाल आणि तुमच्या पुढील सुट्ट्या परदेशातील एखाद्या सुंदर बेटावर घालवण्याची योजना करत असाल, तर आज आम्ही तुम्हाला एका खास बेटाबद्दल सांगणार आहोत, जे भारतीयांसाठी व्हिसा-फ्री आहे!2 / 7या बेटाची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, हे संपूर्ण बेट 'ड्यूटी फ्री' आहे. याचाच अर्थ, तुमची विदेश यात्रा खूपच कमी खर्चात पूर्ण होणार आहे. भारतीय पर्यटकांसाठी हे बेट एक उत्कृष्ट आणि बजेट फ्रेंडली आंतरराष्ट्रीय डेस्टिनेशन ठरत आहे. मलेशियापासून फक्त ३० किलोमीटर दूर असलेल्या अंदमान समुद्रातील ९९ बेटांचा हा समूह आहे, ज्याला 'लंगकावी आयलंड' म्हणून ओळखले जाते.3 / 7लंगकावी आयलंड इतके स्वस्त आहे की, अनेकांना येथे वारंवार भेट द्यावीशी वाटते. येथील स्वस्ताई तुम्हाला थक्क करेल. या बेटावर १ लिटर पेट्रोलची किंमत फक्त ४० रुपये आहे, जी कोल्ड्रिंकच्या बाटलीपेक्षाही कमी आहे! येथे स्थानिक पदार्थ खूप स्वस्त आहेत. तुम्ही २०० ते ५०० रुपयांमध्ये पोटभर जेवण करू शकता.4 / 7विदेशात असूनही येथे शाकाहारी जेवणाचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, त्यामुळे तुम्ही घराच्या जेवणाला मिस करणार नाही. तुमच्या बजेटमध्ये येथे अनेक लक्झरी हॉटेल्सही उपलब्ध आहेत. लंगकावीला अनेकजण 'पौराणिक बेट' असेही म्हणतात. येथे तुम्हाला अनेक सुंदर ठिकाणे पाहता येतील.5 / 7येथे तुम्ही धबधबे, पर्वत, नॅचरल पार्क आणि वाईल्ड लाईफ एरिया एक्सप्लोर करू शकता. या बेटावर तुम्हाला स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग, जंगल ट्रेकिंग, मॅंग्रोव्ह कयाकिंग, स्काय ब्रिज आणि केबल कारचा थरार अनुभवता येईल. यासाठी फक्त १००० ते २००० रुपये खर्च येतो. पंतई सेनांग बीचवर फेरफटका मारण्याचा आणि किलिम जिओ फॉरेस्टचा आनंद घेण्याचा अनुभव अविस्मरणीय असेल.6 / 7लंगकावीमध्ये राहण्यासाठी एका रात्रीचा खर्च साधारण २५०० ते ५००० रुपये प्रति रात्र आहे. दिवसभराच्या जेवणासाठी तुम्हाला सुमारे १००० रुपये खर्च करावे लागतील. कुआलालंपूरपासून फक्त १ तासाच्या अंतरावर असलेल्या लंगकावीला विमानाने जाण्यासाठी फक्त २००० रुपये खर्च येतो. भारतातून लंगकावीसाठी थेट फ्लाईट उपलब्ध आहे, ज्याचा प्रतिव्यक्ती खर्च सुमारे २५ हजार रुपये आहे.7 / 7लंगकावीला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ नोव्हेंबर ते मार्च दरम्यान आहे. या काळात येथील हवामान थंड आणि खूप सुखद असते, ज्यामुळे पर्यटन करण्याचा आनंद द्विगुणित होतो. त्यामुळे, सणासुदीनंतर तुम्ही या 'बजेट-फ्रेंडली' बेटाचा प्लॅन नक्कीच करू शकता!