भारतीयांसाठी 'लॉटरी'! १ लाख रुपयांचे होतील ७५ लाख; दक्षिण अमेरिकेतील 'या' देशात राजेशाही थाटात जगाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 14:20 IST
1 / 8परदेशात फिरायला जाणे म्हणजे खिशाला कात्री आणि लाखो रुपयांचा खर्च, असे समीकरण सर्वसामान्य भारतीयांच्या मनात असते. विशेषतः डॉलर, पाउंड किंवा युरो यांसारख्या महागड्या चलनामुळे अनेकजण परदेशवारीचे स्वप्न सोडून देतात. 2 / 8पण, जर आम्ही तुम्हाला सांगितले की एक असा देश आहे जिथे भारतीय रुपयाचे मूल्य इतके जास्त आहे की, तिथे गेल्यावर तुम्ही सहज 'लखपती' किंवा 'करोडपती' होऊ शकता? होय, हा देश आहे दक्षिण अमेरिकेतील पॅराग्वे!3 / 8पैराग्वेची अधिकृत करन्सी 'गुआरानी' ही आहे. जागतिक बाजारात या चलनाचा दर भारतीय रुपयाच्या तुलनेत बराच कमी आहे. ताज्या आकडेवारीनुसार, १ भारतीय रुपया = अंदाजे ७५ पॅराग्वे गुआरानी इतका आहे. याचाच अर्थ, जर तुम्ही भारतातून १ लाख रुपये घेऊन पॅराग्वेला गेलात, तर तुमच्या खिशात तब्बल ७५ लाख गुआरानी असतील. 4 / 8जर तुम्ही तिथे १५ लाख रुपये घेऊन गेलात, तर तुम्ही तिथल्या चलनानुसार 'करोडपती' बनाल. यामुळेच बजेट ट्रॅव्हलर्ससाठी पॅराग्वे हे आता एक नवे हॉट डेस्टिनेशन म्हणून समोर येत आहे.5 / 8पॅराग्वेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला प्रत्येक वस्तूची किंमत हजारोंमध्ये दिसेल. यामुळे सुरुवातीला तुम्हाला दचकायला होईल, पण रुपयाचे गणित मांडले की, तुम्हाला ते स्वस्त वाटू लागेल. या देशात एक कप कॉफी १५,००० ते २०,००० गुआरानीमध्ये (भारतीय चलनात सुमारे २००-२६० रुपये) मिळते. तर, हॉटेलमध्ये जेवण ५०,००० ते ७०,००० गुआरानीमध्ये होऊ शकते.6 / 8तिथले चलन 'डिनॉमिनेशन'मध्ये मोठे असल्याने तुम्हाला २००० किंवा ५००० च्या नोटांऐवजी थेट १०,०००, २०,००० आणि ५०,००० गुआरानीच्या नोटा हाताळायला मिळतील.7 / 8पॅराग्वे हा देश केवळ स्वस्त आहे म्हणून नाही, तर तिथल्या नैसर्गिक सौंदर्यासाठीही ओळखला जातो. या देशाच्या चलनाला तिथल्या मूळ 'गुआरानी' जमातीचे नाव देण्यात आले आहे. १९४४ पासून हे चलन तिथे चलनात आहे. दक्षिण अमेरिकेतील इतर देशांच्या तुलनेत पॅराग्वेची अर्थव्यवस्था आणि चलन अधिक स्थिर मानले जाते. इथला 'इतैपू धरण' आणि 'जेसुइट मिशन'ची ऐतिहासिक स्थळे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहेत.8 / 8जरी पॅराग्वेमध्ये रुपयाची ताकद जास्त असली, तरी तिथे जाण्यासाठी विमान प्रवास महाग असू शकतो. कारण भारत आणि पॅराग्वेमध्ये थेट विमान सेवा नाही. तुम्हाला दुबई किंवा युरोपमार्गे जावे लागते. मात्र, एकदा तिथे पोहोचलात की राहण्याचा, खाण्याचा आणि फिरण्याचा खर्च हा गोव्यातील ट्रिपपेक्षाही कमी असू शकतो.