रेल्वेनं गावी जाताय? रात्रीच्या प्रवासात ‘या’ ४ चूका करू नका अन्यथा महागात पडेल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 06:38 PM2022-03-31T18:38:57+5:302022-03-31T18:42:03+5:30

जेव्हा कधीही लोकांना प्रवास करायचा असतो तर त्यांच्या सोयीनुसार, कार, बस, ट्रेन अथवा विमानापैकी एका पर्यायाची निवड करतात. परंतु सर्वसामान्यांना परवडेल अशा स्वस्त दरात कुठला प्रवास देशात होत असेल तर तो म्हणजे भारतीय रेल्वेने केलेला प्रवास

रेल्वेमध्ये लाखो लोकं प्रवास करत असतात. अगदी लोकलपासून ते लांब पल्ल्याच्या गाड्याही पूर्ण क्षमतेने प्रवाशांनी भरलेल्या असतात. एक्सप्रेस गाड्यांचे तिकीट काढण्यासाठीही महिनाभर पूर्वीच बुकींग केले जाते. रेल्वेचा प्रवास लोकांच्या सोयीस्कर असतो.

रेल्वे प्रवासावेळी कन्फर्ट सीट, झोपण्याची सुविधा, शौचालय आणि खाण्या-पिण्याच्या सर्व गोष्टी उपलब्ध असतात त्यामुळे रेल्वे प्रवासाचा कंटाळा येत नाही. परंतु अनेकदा सह प्रवाशाच्या कारनाम्यामुळे इतर प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो.

मात्र रेल्वेने आता नियमांत बदल केला आहे. कुठलाही प्रवाशी इतर प्रवाशाला त्रास देत असेल तर त्याच्याविरोधात रेल्वे कडक पाऊल उचलणार आहे. जर रेल्वेच्या या नियमांचे कुणी प्रवाशाने उल्लंघन केले तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.

अनेक प्रवासी रात्रीच्या रेल्वेचा प्रवास करतात. त्यावेळी मोबाईल अथवा स्पीकरवर मोठ्या आवाजाने गाणी ऐकत असतात. यामुळे रेल्वेतील इतर प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. परंतु जर आता तुम्ही हे कृत्य कराल तर तुमची खैर नाही

काही जण ट्रेनमध्ये एकटेच प्रवास करतात, तर बरेच लोक त्यांच्या मित्रांसोबत किंवा मोठ्या ग्रुपमध्ये प्रवास करतात. यादरम्यान हे लोक मोठ्या आवाजात बोलतात, त्यामुळे इतर प्रवाशांना त्रास होतो. असं केल्याने तुमच्यासाठीही त्रासदायक होऊ शकतं.

जवळपास सर्व प्रवासी रात्रीच्या वेळी ट्रेनमध्ये झोपतात, परंतु अशा परिस्थितीत जर एखाद्या प्रवाशाने रात्री दिवे लावले आणि त्याचा त्रास इतर प्रवाशांना होतो. रेल्वेच्या कम्पार्टमेंटमधील दिवे बंद करण्याची सुविधा असते. तरीही तुम्ही जाणूनबुजून दिवे सुरूच ठेवले तर अडचणीचे ठरू शकते.

अनेकांना सवय असते की, त्यांना आजूबाजूला काहीही दिसत नाही आणि मोबाईलवर मोठ्याने बोलतात. पण आता तुम्ही ट्रेनमध्ये हे करू शकणार नाही, कारण जर तुम्ही हे केले आणि त्यामुळे कुणाला त्रास झाला त्याने तक्रार केल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते.

मागील स्लाइड्समध्ये नमूद केलेल्या कोणत्याही गोष्टी केल्यास, तुम्ही TTE कडे तक्रार करू शकता. अशा स्थितीत टीटीई तुम्हाला समजावून सांगेल, पण तुम्ही ऐकले नाही, तर आरपीएफ आणि जीआरपी कर्मचारी अशा प्रवाशांचे चलन कापून कलम १४५ अंतर्गत कारवाई करू शकतात.