दोन देशांच्या सीमेवरचं गाव! सरपंचाची बेडरुम भारतात अन् किचन म्यानमारमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 15:04 IST
1 / 5भारत आणि म्यानमारच्या सीमेवर वसलेलं लांगवा गाव अतिशय वैशिष्टपूर्ण आहे. नागालँडच्या मोन जिल्ह्यातलं या गावाचा काही भाग भारतात, तर काही भाग म्यानमारमध्ये आहे. 2 / 5लांगवा गाव शहरापासून 42 किलोमीटर आहे. या गावच्या सरपंचाचं निम्मं घर भारतात, तर निम्मं घर म्यानमारमध्ये आहे. 3 / 5भौगोलिकदृष्ट्या लांगवाचं स्थान अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामुळे इथल्या सरपंचाची बेडरुम भारतात आहे, तर किचन म्यानमारमध्ये. 4 / 5लांगवा गावातील लोकांना भारतात आणि म्यानमारमध्ये प्रवेश मिळतो. त्यांना यासाठी विसा लागत नाही.5 / 5या गावातील लोकांकडे दोन देशांचं राष्ट्रीयत्व आहे. जगातील अनेक देशांच्या सीमांवर तणाव असतो. पाकिस्तान, चीनसोबतच्या सीमेवर तर वर्षभर स्फोटक परिस्थिती असते. मात्र लांगवा गावातील चित्र पूर्ण वेगळं आहे.