शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' ऑफबीट ठिकाणी स्वातंत्र्य दिन करा साजरा; ट्रिप राहील अविस्मरणीय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2023 6:36 PM

1 / 5
स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी अनेक जण फिरण्याचा प्लॅन सुद्धा करतात. जर तुम्हीही असाच प्लॅन करत असाल तर अशा परिस्थितीत मसुरी, शिमला आणि नैनिताल सारखी गर्दीची ठिकाणे टाळून, तुम्ही इतर अनेक ऑफबीट ठिकाणांनाही भेट देऊ शकता.
2 / 5
तुम्ही बंदीपूर नॅशनल पार्कला भेट देण्यासाठी जाऊ शकता. दक्षिण भारतातील हे उद्यान तुम्हाला खूप आवडेल. तुम्ही बंदिपूर सारखी ऑफबीट ठिकाणे देखील एक्सप्लोर करू शकता. जर तुम्हाला वन्यजीव आवडत असतील तर तुम्ही इथे एकदा अवश्य भेट द्या.
3 / 5
खजुराहो हे अतिशय सुंदर पर्यटन स्थळ आहे. खजुराहोची मंदिरे आपल्या वास्तुकलेसाठी जगभर प्रसिद्ध आहेत. या मंदिरांची स्थापत्यकला पाहण्यासाठी लोक लांबून येतात. जर तुम्ही कलाप्रेमी असाल तर तुम्ही या ठिकाणी अवश्य भेट द्या. हे ठिकाण पर्यटकांना खूप आकर्षित करते.
4 / 5
चित्तौडगड आपल्या समृद्ध संस्कृती आणि वारशासाठी प्रसिद्ध आहे. जर तुम्हाला ऐतिहासिक ठिकाणांना भेट द्यायची असेल तर तुम्ही चित्तौडगडला जाऊ शकता. येथे तुम्ही चित्तौडगड किल्ला, पद्मिनी पॅलेस, राणा कुंभा पॅलेस आणि काली माता मंदिर यासारख्या ठिकाणांना भेट देऊ शकता.
5 / 5
चिकमंगळूर हे कर्नाटकातील एक उत्तम पर्यटन स्थळ आहे. येथील कॉफीचे मळे, धबधबे, जंगले आणि हिरवीगार कुरणं पर्यटकांना खूप आकर्षित करतात. या ठिकाणी तुम्हाला खूप आराम वाटेल.
टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनTravel Tipsट्रॅव्हल टिप्स