शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Honeymoon Destinations: भारतातील 7 रोमँटिक ठिकाणं, जिथं फक्त 20, 000 हजार रुपयांत होऊ शकतं हनिमून!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2021 3:40 PM

1 / 8
लग्नानंतर प्रत्येकाला आपल्या लाइफ पार्टनरसोबत हनिमूनला रोमँटिक ठिकाणी जायचे असते, पण आधीच लग्नात आलेला खर्च पाहता, अनेक जण अशा ठिकाणी जाण्याबाबत बराच विचार करताना दिसून येतात. तुम्हीही अशाच गोंधळात अडकले, असाल तर घाबरण्याची गरज नाही. उत्तर भारतात अशी अनेक रोमँटिक आणि सुंदर ठिकाणे आहेत, जिथे तुम्ही फक्त 20 हजार रुपयांमध्ये हनिमून साजरा करू शकता.
2 / 8
मनालीच्या हवेत रोमान्सचा सुगंध दरवळला असल्याचे लोक म्हणतात. आजूबाजूला हिरवळ, उंच पर्वत आणि स्वर्गासारखी दृश्ये मनालीला एक सुंदर हनिमून डेस्टिनेशन बनवतात. डोंगरावर बांधलेली कॉटेज आणि जंगलाजवळ बांधलेली हॉटेल्स हनिमूनला अधिक रोमांचक बनवतात. सीझननुसार, तुम्ही येथे पॅराग्लायडिंग, रिव्हर राफ्टिंग, जंगल सफारी आणि ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता.
3 / 8
नालदेहरा हे शिमल्याच्या जवळपास असलेले एक अनोखे हिल स्टेशन आहे. येथील प्रसन्न वातावरण, हिरवाई आणि आकर्षक दृश्य या ठिकाणाचे सौंदर्य दिसून येते. जोडीदारासोबत अॅडव्हेंचर वॉकला जाण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे. येथे तुम्ही जोडीदारासोबत घोडेस्वारीचा आनंद घेऊ शकता. झिप लाइनिंगद्वारे तुम्ही सुंदर मैदानाचे दृश्य पाहू शकता. येथे राहण्यासाठी तुम्हाला कॉटेज किंवा हॉटेल रूम स्वस्तात मिळेल.
4 / 8
डोंगरांमधून वाहणाऱ्या धबधब्यासोबत हनिमूनची अनुभूती घ्यायची असेल, तर मॅकलॉडगंज हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. येथे बर्फाच्छादित शिखरे, थंड हवा आणि जंगलांमध्ये बांधलेले काही आधुनिक आर्ट कॅफे तुम्हाला एक चांगला अनुभव देईल. नड्डी आणि भगसू फॉल्स सारखी काही चांगली ठिकाणे देखील आहेत. मॅकलॉडगंजमधला तुमचा हनिमून 20 हजार रुपयांमध्ये आरामात पूर्ण होईल.
5 / 8
जर तुम्हाला हनिमूनसाठी बजेटमध्ये एक लक्झरी फिलिंग मिळवायचा असेल तर जयपूरहून चांगली जागा मिळणे अवघड आहे. गुलाबी शहराच्या रंगीबेरंगी रस्त्यांचे मनमोहक दृश्य तुम्हाला परत जाऊ देणार नाही. येथे तुम्ही रामगड तलावात बोटिंगचा आनंद घेऊ शकता. हवा महलच्या समोरील रेस्टॉरंटच्या टेरेसवर पारंपारिक फ्लेवर्सची चव जोडीदारासोबत घालवलेले क्षण संस्मरणीय बनवेल.
6 / 8
सुंदर नैसर्गिक दृश्ये आणि निर्मळ परिसर राणीखेतला एक सुंदर हनिमून डेस्टिनेशन बनवतात. पक्ष्यांचा किलबिलाट आणि हिमालयाच्या शिखरांचे मनमोहक दृश्य रोमान्समध्ये गोडवा देण्याचे काम करतात. जंगलाला लागून असलेल्या रस्त्यांवर लहान-लहान स्टॉल्सवर तुम्ही येथे हलका नाश्ता घेऊ शकता. ट्रेकिंगला जाण्यासाठी तुम्हाला येथे अनेक सुंदर ठिकाणे मिळतील.
7 / 8
निसर्गावर प्रेम करणाऱ्यांसाठी हिमाचल प्रदेशातील तीर्थन घाटी एखाद्या स्वर्गापेक्षा कमी नाही. तीर्थन घाटी हिमालय राष्ट्रीय उद्यानापासून 3 किलोमीटर अंतरावर आहे. हे ठिकाण ट्राउट माशांसाठी लोकप्रिय आहे. तीर्थन घाटीमध्ये तुम्ही आरामात जवळपास 20,000 रुपयांमध्ये हनिमून साजरा करू शकता.
8 / 8
दिल्ली-एनसीआरमध्ये राहणारे लोक बीर बिलिंगमध्ये हनिमून प्लॅन देखील करू शकतात. हिमाचल प्रदेशातील हे सुंदर ठिकाण स्पोर्ट्स अॅडव्हेचर्स जसे की पॅराग्लायडिंग, ट्रेक किंवा मेडिटेशन यासाठी फेमस आहे. येथे तुम्हाला तिबेटी संस्कृतीची झलकही पाहायला मिळेल. याठिकाणी तुम्ही 20,000 रुपयांमध्ये आरामात हनिमून साजरा करू शकता.
टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सJara hatkeजरा हटके