भारतातील कॅम्पिंगसाठी 5 सुंदर ठिकाणं, एकदा नक्कीच फिरून या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 15:33 IST
1 / 5जैसलमेर हे प्रसिद्ध पर्यटनस्थळांपैकी एक आहे. जैसलमेर हे शहर थार वाळवंटाच्या अगदी मध्य भागी स्थित नसले तरी बऱ्यापैकी वाळवंटी भागात स्थित आहे. त्यामुळेच जैसलमेर कॅम्पिंगसाठी प्रसिद्ध आहे. 2 / 5अंजुना बीच हे उत्तर गोव्यात स्थित आहे. गोव्याची राजधानी पणजीपासून अंजुना बीच 18 किलोमीटर अंतरावर आहे. या बीचवर लाल रंगाची वाळू आहे. त्यामुळे पर्यटकांचं हे आकर्षणाचं केंद्रबिंदू आहे. 3 / 5स्पिती घाटी ही हिमाचल प्रदेशच्या लाहोल आणि स्पिती जिल्ह्यांमध्ये स्थित आहे. इथे पर्यटक कॅम्पिंग करण्यासाठी मोठ्या प्रमाणात येतात. 4 / 5उत्तराखंडमधील मसुरीही कॅम्पिंगसाठी प्रसिद्ध आहे. दिल्लीपासून हे फारच जवळ आहे. मार्चपासून जूनपर्यंत आपण इथे कॅम्पिंग करू शकता. 5 / 5काश्मीरमधील सोनमर्गही स्वर्गाएवढं सुंदर आहे. इथले डोंगर आणि नद्या पर्यटकांना सदोदित आकर्षित करतात. या ठिकाणी कॅम्पिंग करण्याची मजा काही औरच आहे. श्रीनगरवरून आपण सोनमर्गचा जाऊ शकता.