शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

निसर्गाचं वरदान लाभलेले जगातले पाच नैसर्गिक धबधबे आवर्जून पाहा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2019 3:45 PM

1 / 6
नैसर्गिक धबधब्यांचा आनंद लुटण्याची मज्जा काही वेगळीच असते. निसर्गाचं अद्भुत सौंदर्य आणि उंचावरून कोसळणारे हे धबधबे अनेकांना आकर्षित करतात. जगात असे अनेक धबधबे आहेत, ज्यांना निसर्गाचं अप्रूप असं देणं लाभलेलं आहे.
2 / 6
छत्तीसगडमधला चित्रकोट धबधबा- निसर्गाच्या सान्निध्यात असलेला सुंदर धबधबा आहे. या धबधब्याला भारताचा नायग्रा फॉल म्हतात. या धबधब्याची उंची 29 फुटांवरून असून, निसर्गाचं अद्भुत देणगी या धबधब्याला लाभली आहे.
3 / 6
वेंटिस्किरो कोलगर्ल फॉल्स- वेंटिरस्किरो कोलगर्ल धबधबा फारच सुंदर आहे. हा धबधबा क्वेलट नॅशनल पार्कजवळ आहे. याचा शोध 1875मध्ये लागला होता. वेंटिस्किरो कोलगर्ल फॉल्स धबधबा हा 18000 फूट उंचावरून कोसळतो.
4 / 6
बर्नी जलप्रपात- बर्नी जलप्रपात हा धबधबा अमेरिकेत आहे. कॅलिफोर्निया स्थित असलेला हा धबधबा 129 फूट उंचावरून कोसळतो.
5 / 6
मध्य प्रदेशातील धुंधर धबधबा- धुंधर हा धबधबा मध्य प्रदेशातील नर्मदा नदीवर आहे. या धबधब्याचा अर्थ धूर असा आहे. हा धबधबा 98 फुटांवरून कोसळतो.
6 / 6
फेअरी फॉल्स, अमेरिका- हा सुंदर धबधबा 960 फूट उंचावरून कोसळतो. फोटोग्राफीसाठी हा धबधबा बेस्ट आहे.