शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 14:08 IST

1 / 8
जर तुम्ही समुद्रप्रेमी असाल, तर भारतातील हे समुद्रकिनारे तुमच्यासाठी स्वर्गापेक्षा कमी नाहीत. इथे तुम्हाला गर्दीपासून दूर शांतता आणि निसर्ग सौंदर्य अनुभवायला मिळते. हे समुद्रकिनारे 'सनबाथ' आवडणाऱ्या लोकांसाठी परिपूर्ण आहेत.
2 / 8
राधानगर बीच, अंदमान: चमकदार पांढरी वाळू आणि स्फटिकासारखे स्वच्छ पाणी असलेला हा बीच आशियातील सर्वात सुंदर समुद्र किनाऱ्यांपैकी एक आहे. इथली शांतता मनाला भुलवणारी आहे.
3 / 8
आग्वाद बीच, गोवा: जर तुम्हाला गोव्याच्या गर्दीतून बाहेर पडून समुद्रकिनाऱ्याचा आनंद घ्यायचा असेल, तर आग्वाद परिपूर्ण आहे. येथे सूर्याची उष्णता आणि वाळूचा थंड स्पर्श तुमचा दिवस बनवेल.
4 / 8
वर्कला बीच, केरळ: वर्कलाचा उंच कडा आणि खाली पसरलेले अरबी समुद्राचे दृश्य त्याला अद्वितीय बनवते. येथील शांत वातावरण आणि समुद्री वाऱ्यांची हळूवार झुळूक तुमच्या सनबाथची मजा द्विगुणित करते.
5 / 8
कोवलम बीच, केरळ: कोवलम समुद्र किनाऱ्याची रुंदी आणि त्यावर आदळणाऱ्या शांत लाटा यामुळे हा बीच अतिशय सुंदर भासतो. येथील वातावरण इतके आरामदायी आहे की, वेळही थांबल्यासारखी वाटते.
6 / 8
तारकर्ली बीच, महाराष्ट्र: मालवणजवळील तारकर्ली बीच, तिथल्या स्वच्छ वाळूसाठी आणि शांत वातावरणासाठी ओळखला जातो. या समुद्रात डायव्हिंग करण्याचा अनुभव वेगळाच आनंद देतो.
7 / 8
ऑरोविले बीच, पुद्दुचेरी: ऑरोविले हे फ्रेंच टच आणि अध्यात्माचे परिपूर्ण मिश्रण आहे. येथील समुद्रकिनाऱ्यावर उन्हात बसून, पुस्तक वाचून आणि फक्त समुद्राकडे पाहणे, एखाद्या थेरपीसारखे वाटते.
8 / 8
गोपालपूर-ऑन-सी, ओडिशा: पूर्व भारतातील हा प्रसिद्ध समुद्रकिनारा त्याच्या नेत्रदीपक सूर्योदय आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे.
टॅग्स :tourismपर्यटन