PHOTOS : लाईफ टाइम मेमरी... मंत्री आव्हाडांनी शेअर केला लेकीच्या लग्नाचा व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 11:59 IST
1 / 12राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीचा विवाहसोहळा काही दिवसांपूर्वी अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला. 2 / 12एकीकडे अनेक नेते मोठ्या थाटामाटात आपल्या मुलांची लग्नं लावत असताना जितेंद्र आव्हाड यांनी मात्र अत्यंत साध्या पद्धतीने मुलीचं लग्न लावलं. 3 / 12जितेंद्र आव्हाड यांची कन्या नताशा आव्हाड हिचा विवाह एलन पटेल याच्याशी झाला. साधेपणाने झालेल्या या विवाहाला काही मोजकी मंडळी उपस्थित होती. 4 / 12नताशा आव्हाड हिचा विवाह एलन पटेल यांचा विवाह नोंदणी पद्धतीने विशेष मॅरेज अॅक्टनुसार झाला. रजिस्टर पद्धतीने करण्यात आलेल्या या लग्नात काही मोजकेच पाहुणे उपस्थित होते. त्यानंतर, आता ख्रिश्चन पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला आहे. 5 / 12नताशा ही जितेंद्र आव्हाड यांची एकुलती एक मुलगी आहे. एलेन पटेल यांच्याशी तिचा विवाह पार पडला. एलेन आणि नताशा इयत्ता पहिलीपासून एकत्र शिकले आहेत. 6 / 12पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर हे या सोहळ्याला आणि नवदाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी गोव्यात उपस्थित होते. 7 / 12गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कन्येचा ख्रिश्चन पद्धतीने गोव्यात विवाह संपन्न झाला. आव्हाड यांचे जावाई एलेन हे ख्रिश्चन धर्मीय आहेत, त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांच्या इच्छेनुसार हा मॅरेज सोहळा झाला. 8 / 12गोव्यातील समुद्रकिनारी नताशा आणि एलेन यांचा ख्रिश्चन पद्धतीने परंपरा जपत लग्नसोहळा पार पडला. त्यासाठी शिवसेना नेत्यांनी जयपूरहून गोवा गाठत, या सोहळ्याला उपस्थिती लावली.9 / 12जितेंद्र आव्हाड यांनी गोव्यातील या विवाहसोहळ्याचे व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. तसेच, एलेन हा ख्रिश्चन धर्मीय असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी ख्रिश्चन पद्धतीने हा लग्न सोहळा केल्याचंही त्यांनी सांगितलं. 10 / 12आपल्या लाडक्या लेकीच्या लग्नावेळी आव्हाड भावूक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. आता, मुलीच्या ख्रिश्चन पद्धतीने झालेल्या विवाहसोहळ्यातही त्यांनी बापाची भूमिका निभावली. 11 / 12ख्रिश्चन पद्धतीने विवाह करताना, त्यांच्या रुढी-पंरपरेनुसार वधुपित्याने मुलीची पाठवणी केली. माझी लहान मुलगी आता नताशा अलेन पटेल झाल्याचंही त्यांनी ट्विटरवरुन सांगितलं. 12 / 12नताशा आणि अलेन हे दोघेही स्वतंत्र व्यक्तीमत्व आहेत. त्यामुळेच, दोघांच्या लग्नपद्धतीच्या आवडीचा ते आदर करतात, असेही आव्हाड यांनी सांगितले.