‘जा मुली तू जा दिल्या घरी तू सुखी रहा’, कन्येच्या विवाहानंतर मंत्री जितेंद्र आव्हाड भावूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 17:07 IST
1 / 7महाराष्ट्र सरकारमधील गृहनिर्माणमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असलेल्या जितेंद्र आव्हाड यांच्या कन्येचा विवाह सोहळा आज साधेपणाने पार पडला. 2 / 7जितेंद्र आव्हाड यांची कन्या नताशा आव्हाड हिचा विवाह एलन पटेल याच्याशी झाला. साधेपणाने झालेल्या या विवाहाला काही मोजकी मंडळी उपस्थित होती. (फोटो - विशाल हळदे) 3 / 7नताशा आव्हाड हिचा विवाह एलन पटेल यांचा विवाह नोंदणी पद्धतीने विशेष मॅरेज अॅक्टनुसार झाला. (फोटो - विशाल हळदे) 4 / 7त्यानंतर वधु-वरांनी एकमेकांना हार घालत उपस्थित असलेल्या ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले. तसेच शुभेच्छा स्वीकारल्या. (फोटो - विशाल हळदे) 5 / 7या विवाह सोहळ्याला उपस्थित असलेले नताशा आव्हाड आणि एलन पटेल यांचे नातेवाईक. 6 / 7दरम्यान, विवाह सोहळ्यानंतर एकुलत्या एक मुलीची पाठवणी करताना जितेंद्र आव्हाड भावूक झाले. त्यांनी विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मिडियावर शेअर करत आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. 7 / 7जा मुली तू जा दिल्या घरी तू सुखी रहा ......, बाबुल कि दुआये लेती जा, जा तुझको सुखी संसार मिले ..... अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.