ऋतुजा बागवेने सोशल मीडियावर लावला बोल्डनेसचा तडका; फोटो पाहून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 05:12 PM2022-04-07T17:12:13+5:302022-04-07T17:16:08+5:30

Rutuja Bagwe: कायम साध्या, सोज्वळ रुपात दिसणाऱ्या ऋतुजाचा हा नवा लूकही चाहत्यांना आवडत आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे ऋतुजा बागवे.

उत्तम अभिनय आणि स्वभावातील साधेपणा यामुळे ऋतुजाने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

गेल्या काही काळात ऋतुजाचा सोशल मीडियावरील वावर वाढला असून ती अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

अलिकडेच ऋतुजाने तिच्या फोटोशूटपैकी काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

कायम साध्या, सोज्वळ रुपात दिसणाऱ्या ऋतुजाचा हा नवा लूकही चाहत्यांना आवडत आहे.

'नांदा सौख्य भरे' मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर एंट्री केली.

चंद्र आहे साक्षीला या मालिकेत तिने सुबोध भावेसोबत स्क्रीन शेअर केली होती.

ऋतुजा अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.