खुशखबर..! शेवंता लवकरच येणार भेटीला, 'रात्रीस खेळ चाले २'च्या शूटिंगला होणार सुरूवात  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 08:03 PM2020-06-10T20:03:25+5:302020-06-10T20:10:54+5:30

शेवंता लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात जवळपास अडीच महिन्यांच्या लॉकडाऊन नंतर आता हळूहळू देश पूर्ववत व्हायला सुरुवात झाली आहे.

तसेच मालिकांच्या चित्रीकरणाला देखील परवानगी मिळाली आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या लाडक्या मालिका आता लवकरच त्यांच्या भेटीला येतील.

पण या अडीच महिन्यांच्या मोठ्या सुट्टी नंतर भूमिकेपासून लांब असलेले कलाकार चित्रीकरणाची तयारी कशी करत आहेत हे जाणून घ्यायची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना आहे.

रात्रीस खेळ चाले २ या मालिकेतील सर्वांची आवडती शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हि देखील या सुट्टीमध्ये तिच्या भूमिकेपासून लांब गेली आहे का असं विचारलं असताना ती म्हणाली, "मी माझ्या भूमिके पासून कधी वेगळी नव्हतेच.

प्रेक्षकांच्या आग्रहास्तव माझ्या भूमिकेतील फोटोज सोशल मीडियावर शेअर केले. शिवाय जेव्हा मी इंस्टाग्रामवर लाईव्ह गेले तेव्हा देखील मी शेवंताचा लुक केला होता, असे अपूर्वाने सांगितले.

अपूर्वा म्हणाली की, लॉकडाऊनमध्ये मी प्रेक्षकांना माझ्या पात्राशी जोडून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. शेवंताचं पात्र हे माझ्या अंगात इतकं भिनलंय, त्यामुळे हि भूमिका पुन्हा साकारताना निश्चितच मजा येईल.

अपूर्वाने आभास हा, तू माझा सांगाती, प्रेम हे यांसारख्या मालिकेत तर एकापेक्षा एक जोडीचा मामला या रिअॅलिटी शो मध्ये देखील काम केले आहे.

तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेमुळेच मिळाली.

तिने मालिकेत काम करण्यासोबतच चोरीचा मामला, आलाय मोठा शहाणा यांसारख्या नाटकांत काम केले आहे.

तसेच इश्कवाला लव्ह या चित्रपटातही ती झळकली होती.