शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' सोप्या ट्रिक्स फॉलो करा ... तुमच्या व्हॉट्सॲप स्टोरेजचे टेन्शन होईल दूर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 17:31 IST

1 / 7
आजकाल व्हॉट्सॲप आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. सध्या व्हॉट्सॲप हे मित्र, कुटुंब आणि कार्यालयीन कामासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. मात्र, व्हॉट्सॲपवर सतत फाइल्स, फोटो, व्हिडीओ आणि मेसेज येत असल्यामुळे फोनचा स्टोरेज लवकर भरतो.
2 / 7
जेव्हा स्टोरेज फुल होते, तेव्हा फोनचा स्पीड मंदावतो. शिवाय नवीन फाइल्स डाउनलोड करण्यातही अडचण येते. जर तुम्ही देखील व्हॉट्सॲप स्टोरेजच्या समस्येने त्रस्त असाल तर येथे काही सोप्या ट्रिक्स आहेत, ज्या तुम्हाला मदत करतील.
3 / 7
व्हॉट्सॲपमध्ये Manage Storage नावाचे एक इनबिल्ट फीचर आहे. ते तुम्ही Settings > Storage and Data > Manage Storage मध्ये जाऊन अॅक्सेस करू शकता. येथे तुम्हाला मोठ्या साइजच्या फाइल्स आणि वारंवार फॉरवर्ड केलेले मेसेज मिळतील. तुम्ही ते सिलेक्ट करून डिलिट करू शकता, त्यामुले स्टोरेज खाली होईल.
4 / 7
मीडिया फाइल्स व्हॉट्सॲपवर ऑटोमॅटिकली डाउनलोड होतात, ज्यामुळे स्टोरेज लवकर फुल होते. ते बंद करण्यासाठी,Settings > Storage and Data > Media Auto-Download मध्ये जाऊन आणि सर्व ऑप्शन्सना No Media वर क्लिक करा. यामुळे आता तुम्हाला पाहिजे, तेव्हाच फाइल्स डाउनलोड होतील.
5 / 7
ग्रुप्समध्ये शेअर केलेले फोटो आणि व्हिडिओ हे स्टोरेज फुल होण्याचे मुख्य कारण असते. तुम्ही ग्रुप्ससाठी मीडिया सेव्ह ऑप्शन हा डिसेबल करू शकता. यासाठी ग्रुप चॅट ओपन करा, वरील तीन डॉट्सवर क्लिक करा आणि Media Visibility ला No वर सेट करा.
6 / 7
महत्त्वाच्या फाइल्स आणि फोटो क्लाउडवर (Google Drive किंवा iCloud) सेव्ह करा . याच्या मदतीने तुम्ही ते डिलिट करून तुमच्या फोनमध्ये जागा बनवू शकता.
7 / 7
जुने आणि अनावश्यक चॅट्स डिलीट करण्याची सवय लावा. स्टोरेज मॅनेजमेंटची ही सर्वात सोपी पद्धत आहे. या ट्रिक्स वापरून, तुम्ही व्हॉट्सॲपवर स्टोरेज समस्यांपासून मुक्त होऊ शकता आणि तुमचा फोन अधिक चांगल्या प्रकारे वापरू शकता.
टॅग्स :technologyतंत्रज्ञानWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप