शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्स अ‍ॅपचे मॅसेज डिलीट झालेत? चिंता नको; ही ट्रीक वापरा आणि परत मिळवा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2020 17:04 IST

1 / 8
जर कोणत्याही कारणाने तुमचे व्हॉट्स अॅपवरील मॅसेज डिलीट झाले असतील आणि ते खूप महत्वाचे असतील तर काळजी करण्याचे अजिबात कारण नाही. कारण हे मॅसेज पुन्हा रिकव्हर करता येतात. यासाठी खूप हुशार असण्याचीही गरज नाही. केवळ एका ट्रीकद्वारे हे मॅसेज परत मिळविता येणार आहेत.
2 / 8
लक्षात असू द्या हे फिचर व्हॉट्सअॅपवर नाही. तर फाईल मॅनेजरवर असणार आहेय. जर तुमच्याकडे इनबिल्ट फाईल मॅनेजर नसेल तर तो डाऊनलोड करावा. यानंतर व्हॉट्सअॅपच्या फोल्डरमध्ये जावे. हे फोल्डर अँड्रॉईड आणि अॅपल या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टिममध्ये असतात.
3 / 8
यानंतर तुम्हाला WhatsApp डाटाबेस फोल्डरवर टॅप करावे लागेल. या फोल्डरमध्ये गेल्यावर तुम्हाला ‘msgstore.db.crypt12’ या नावाची फाईल दिसेल. याशिवाय अशा अन्य फाईलही असतील. ही फाईल शोधून त्यावर लाँग प्रेस करावे लागेल.
4 / 8
यानंतर या फाईलच्या मेनू ऑप्शनमध्ये जाऊन रिनेम करावी लागेल. ‘msgstore_backup.db.crypt12’ या नावाने रिनेम करावी. असे केल्याने ही फाईल ओव्हरराईट होणार नाही.
5 / 8
यानंतर सर्वात नवीन फाईल जिचा वेळ, तारीख पाहून निवडावी. तिचे नाव बदलून ‘msgstore.db.crypt12’ करावे.
6 / 8
यानंतर गुगल ड्राईव्हवर जाऊन उजव्या बाजुच्या तीन डॉटवर क्लीक करावे. यातून लेटेस्ट बॅकअप फाईल डिलीट करावी. यानंतर व्हॉट्सअॅपला अनइन्स्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल करावे.
7 / 8
अॅप इन्स्टॉल करताना रिस्टोअर मॅसेज ऑप्शनवर जाऊन बॅकअप सिलेक्ट करावा.
8 / 8
तेथे गेल्यावर msgstore.db.crypt12 फाईल सिलेक्ट करून रिस्टोअर करावी. याद्वारे तुमचे जुने मॅसेजही रिकव्हर होणार आहेत.
टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅप