WhatsApp वर आलाय ‘ब्लर इमेज स्कॅम’; लोकांना ‘असं’ केलं जातंय टार्गेट, किती धोकादायक?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 17:25 IST
1 / 10देशात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. WhatsApp वर आता फसवणुकीची एक नवीन पद्धत समोर आली आहे ज्याला ‘ब्लर इमेज स्कॅम’ असं म्हणतात. यामध्ये भावनांशी खेळून लोकांना फसवलं जात आहे.2 / 10हा स्कॅम एका ब्लर इमेजपासून सुरू होतो आणि शेवटी तुमचं बँक अकाऊंट रिकामं होऊ शकतं किंवा तुमचा डिव्हाइस हॅक होऊ शकतो. 3 / 10लोकांना जाळ्यात अडकवण्यासाठी स्कॅमर तुम्हाला एका अनोळखी नंबरवरून सर्वात आधी WhatsApp वर एक ब्लर इमेज पाठवतो.4 / 10ब्लर फोटोसोबत एक मेसेज लिहिलेला असतो जो तुमची उत्सुकता खूप वाढवतो. हा तुमचा जुना फोटो आहे का?, तुम्ही यात आहात का? कोण आहे ते पाहा असा मेसेज यासोबत असतो.5 / 10मेसेज वाचल्यानंतर बहुतेक लोक नेमकं काय आहे हे पाहण्यासाठी तो फोटो ओपन करण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही क्लिक करताच, तुम्हाला एका बनावट लिंकवर जाता आणि तुमची फसवणूक करण्याची प्रक्रिया सुरू होते.6 / 10तुम्हाला OTP, बँक डिटेल्स किंवा पर्सनल माहिती विचारली जाते. कधीकधी ही लिंक तुमच्या फोनमध्ये व्हायरस किंवा मालवेअर इन्स्टॉल करते.7 / 10या स्कॅममुळे तुमच्या बँक अकाऊंटमधून पैसे गायब होऊ शकतात. WhatsApp, फेसबुक किंवा इन्स्टाग्राम सारखे सोशल मीडिया अकाउंट हॅक केले जाऊ शकतात.8 / 10फोनमधील पर्सनल फोटो, महत्त्वाची माहिती किंवा डेटा चोरीला जाऊ शकतो. फोनला व्हायरस किंवा स्पायवेअर येऊ शकतो.9 / 10या स्कॅमपासून वाचण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्या. अनोळखी नंबरवरून आलेला कोणताही फोटो किंवा लिंक उघडू नका. तुमची WhatsApp प्रायव्हसी सेटिंग्ज मजबूत करा.10 / 10टू-स्टेप व्हेरिफिकेशन ऑन ठेवा. तुमच्या फोनमध्ये एक चांगला अँटी-व्हायरस अॅप इन्स्टॉल करून ठेवा. जर चुकून क्लिक केलं तर ताबडतोब पासवर्ड बदला आणि बँकेला कळवा.