शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

‘या’ स्वस्त स्मार्टफोन्सना हॅकिंगची भीती; नोकिया, सॅमसंग आणि रियलमीच्या मोबाईल्सचा समावेश, पाहा यादी

By सिद्धेश जाधव | Published: March 21, 2022 7:00 PM

1 / 6
Kryptowire च्या एका रिपोर्टनुसार, अनेक लोकप्रिय स्मार्टफोनमध्ये मिळणाऱ्या UNISOC SC9863A प्रोसेसरमध्ये मोठा दोष समोर आला आहे. या त्रुटीमुळे युजरच्या अडचणीत वाढ होऊ शकते.
2 / 6
रिपोर्टनुसार, UNISOC SC9863A चिपसेटसह येणाऱ्या एका अ‍ॅपच्या माध्यमातून हॅकर स्मार्टफोनचा संपूर्ण अ‍ॅक्सेस मिळवू शकतात. अ‍ॅक्सेस मिळाल्यावर डेटा चोरी, डेटा वाईप (डिलीट), फ्रंट कॅमेरा आणि माईक देखील अ‍ॅक्सेस करता येईल.
3 / 6
या त्रुटीचा वापर करून हॅकर कॉल रेकॉर्ड, टेक्स्ट मेसेज, कॉन्टॅक्ट्स आणि इतर खाजगी डेटा मिळवू शकतो. तसेच जगातील कोणत्याही युजरच्या फोनचा फ्रंट कॅमेरा ऑन करून हॅकर व्हिडीओ देखील रेकॉर्ड करू शकतो.
4 / 6
UNISOC SC 9863A प्रोसेसर अनेक बजेट स्मार्टफोन्समध्ये देण्यात आला आहे.
5 / 6
यात Realme C11, Samsung Galaxy A03 Core, Nokia C01 Plus, Nokia C20 Plus, Nokia C30, Gionee Max, Gionee Max Pro, itel A49, Lava Be U आणि Tecno Pop 5 LTE सारख्या स्मार्टफोन्सचा समावेश आहे.
6 / 6
यातील नोकिया युजर्सना दिलासा देणारी बातमी आहे. कंपनीनं हा दोष अपडेट देऊन दूर केला आहे. आणि इतर कंपन्या देखील नोकियाप्रमाणे योग्य ती पाऊलं उचलतील अशी अपेक्षा आहे.
टॅग्स :MobileमोबाइलNokiaनोकियाrealmeरियलमीsamsungसॅमसंग