शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Samsung युजर्स सावधान! अधिकृत अ‍ॅप स्टोरच करतंय धोकादायक अ‍ॅप्सचा प्रसार; अशाप्रकारे सुरक्षित ठेवा स्मार्टफोन

By सिद्धेश जाधव | Published: December 28, 2021 3:11 PM

1 / 6
Samsung Galaxy Store मध्ये मालवेयर असलेले काही अ‍ॅप्स सापडले आहेत, अशी माहिती अँड्रॉइड पोलीस या वेबसाईटनी दिली आहे. कंपनीच्या प्रत्येक स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी स्टोर प्री लोडेड असतो. त्यामुळे हा गुगल प्ले स्टोरप्रमाणे एक मोठा अ‍ॅप स्टोर आहे. यातील काही स्ट्रीमिंग अ‍ॅप्समध्ये धोकायदायक मालवेयर आढळला आहे.
2 / 6
मिळालेल्या माहितीनुसार, सॅमसंग गॅलेक्सी स्टोरमध्ये शोबॉक्स नावाच्या अ‍ॅपचे अनेक क्लोन्स उपलब्ध आहेत. शोबॉक्स टीव्ही सीरिज आणि चित्रपट मोफत दाखवण्याचं काम करतो. रिपोर्टनुसार, या अ‍ॅपचे एक दोन नव्हे तर तब्बल 5 क्लोन्स गॅलेक्सी स्टोरवर सापडले आहेत. या डुप्लिकेट अ‍ॅप्समध्ये मालवेयर लपला असल्याची शक्यता आहे.
3 / 6
यातील काही अ‍ॅप्स अनावश्यक परमिशन्स मागतात, ज्यात कॉल लॉग्स, कॉन्टॅक्टस आणि टेलीफोन्सचा समावेश आहे. रिपोर्टनुसार, हे अ‍ॅप्स इन्स्टॉल करताना गुगल प्ले प्रोटेक्ट कडून वॉर्निंग देखील दिली जाते कि इन्स्टॉल होत असलेला अ‍ॅप धोकादायक असू शकतो.
4 / 6
तुमच्या फोनमध्ये मालवेयर असलेले अ‍ॅप्स आहेत का ते बघा. असल्यास असे अ‍ॅप्स तात्कळ काढून टाका. गुगल प्ले स्टोरवरून Kaspersky आणि Norton 360 इत्यादी अँटी व्हायरस अ‍ॅप्स इन्स्टॉल करण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे.
5 / 6
अ‍ॅप्स इन्स्टॉल करताना ते फक्त गुगल प्ले स्टोरवरूनच इन्स्टॉल करा. कारण इथे सिक्युरिटी स्कॅन करूनच अ‍ॅप्स अपलोड केले जातात. जरी यातून काही धोकादायक अ‍ॅप्स सुटले तरी सिक्योरिटी फर्म्स प्ले स्टोरवर लक्ष ठेवून असतात.
6 / 6
जर तुम्हाला गुगल प्ले स्टोरवर नसणारे अ‍ॅप्स हवे असतील तर असे अ‍ॅप्स फक्त अधिकृत वेबसाईटवरून इन्स्टॉल करा. तसेच इन्स्टॉल करताना परमिशन्सवर लक्ष असू द्या. अनावश्यक डेटा अ‍ॅक्सेस करण्याची परवानगी अ‍ॅपला देऊ नका.
टॅग्स :samsungसॅमसंगtechnologyतंत्रज्ञानSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड