शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

WhatsAppला मोठा फटका; Telegram बनले जगातील सर्वाधिक डाउनलोड केले जाणारे अ‍ॅप!

By श्रीकृष्ण अंकुश | Published: February 08, 2021 4:09 PM

1 / 10
इंस्टंट मॅसेजिंग अ‍ॅप टेलीग्राम (Telegram) हे जगातील सर्वाधिक डाउनलोड केले जाणारे नॉन गेमिंग अ‍ॅप बनले आहे. जानेवारी महिन्यात झालेल्या Telegram च्या एकूण डाउनलोडिंगमध्ये 24 टक्के वाटा हा एकट्या भारताचा आहे.
2 / 10
यासंदर्भात Sensor Tower ने आपल्या नव्या रिपोर्टमध्ये माहिती दिली आहे. सेंसर टावरने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे, 'जानेवारी महिन्यात तब्बल 63 मिलियन म्हणजे 6.3 कोटी लोकांनी टेलीग्राम अ‍ॅप डाउनलोड केले आहे. यांपैकी 1.5 कोटी डाउनलोड्स एकट्या भारतातील आहे.
3 / 10
Telegram अ‍ॅपच्या डाउनलोडिंगमध्ये झालेली ही वाढ WhatsApp च्या नव्या पॉलिसीनंतर बघायला मिळाली आहे. सध्या व्हाट्सअ‍ॅपने आपली पॉलिसी तीन महिन्यांसाठी स्थगित केली आहे.
4 / 10
भारतानंतर इंडोनेशियामध्ये टेलीग्राम अ‍ॅप सर्वाधिक डाउनलोड करण्यात आले आहे.
5 / 10
जानेवारी महिन्यात TikTok अ‍ॅप एकूण 6.2 कोटी लोकांनी डाउनलोड केले आहे. यांपैकी 17 टक्के लोक चीनमधील आहेत. यानंतर 10 टक्के लोक अमेरिकेतील आहेत.
6 / 10
डिसेंबर महिन्यात TikTok हे सर्वाधिक डाउनलोड केले गेलेले अ‍ॅप होते. त्यावेळी टेलीग्राम टॉप-5 मध्येही नव्हते. मात्र, केवळ एका महिन्यातच टेलेग्राम पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहे.
7 / 10
जानेवारी 2021 मधील डाउनलोडिंगच्या बाबतीत Instagram 6व्या स्थानावर आहे आणि यानंतर नॉन-गेमिंग अ‍ॅपमध्ये Zoom, MX Taka Tak, Snapchat आणि Messenger ची सर्वाधिक डाउनलोडिंग झाली आहे. हे आकडे गूगल प्ले-स्टोर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोर या दोन्हींचे आहेत.
8 / 10
जानेवारी महिन्यात टेलीग्रामच्या डाउनलोडिंगचा आकडा 50 कोटींवर - टेलीग्रामने जानेवारी महिन्यात सांगितले होते, की जगभरात त्याच्या डाउनलोड्सची संख्या 50 कोटींच्याही पुढे गेली आहे. केवळ 72 तासांत टेलीग्रामवर 2.5 कोटी नवे युझर्स रजिस्टर्ड झाले होते. यासंदर्भात खुद्द टेलीग्रामचे फाउंडर पावेल दुरोव (Pavel Durov) यांनी माहिती दिली होती.
9 / 10
दुरोव यांनी सांगितले होते, की Telegram कडे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मंथली अ‍ॅक्टिव्ह युझर्सची संख्या 50 कोटी एवढी होती. ती पुढच्या आठवड्यात केवळ 72 तासांत 52.5 कोटी झाली.
10 / 10
दुरोव यांनी सांगितले होते, की Telegram कडे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मंथली अ‍ॅक्टिव्ह युझर्सची संख्या 50 कोटी एवढी होती. ती पुढच्या आठवड्यात केवळ 72 तासांत 52.5 कोटी झाली.
टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपMessengerमेसेंजरTik Tok Appटिक-टॉक