शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चिनी अ‍ॅप्सला दणका देणारं भारतीय अ‍ॅप अवघ्या दोन आठवड्यात झालं लोकप्रिय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2020 3:11 PM

1 / 9
चिनी उत्पादने आणि अ‍ॅप्स भारतात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे काही लोकांनी चीनच्या वस्तू खरेदीवर बहिष्कार टाकला आहे.
2 / 9
मोबाईलवरुन चिनी अ‍ॅप्लिकेशन्स काढून टाकण्यासाठी एक अशाप्रकारचे अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. हे अॅप दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे.
3 / 9
अँड्रॉईडच्या गुगल प्ले स्टोअरवर 'Remove China Apps' नावाचे एक अॅप आहे. हे अॅप जयपूर आधारित एका स्टार्टअपने लाँच केले आहे.
4 / 9
दरम्यान, Remove China Apps नावाप्रमाणे आपले कार्य करते. हे अ‍ॅप वापरकर्त्यांच्या स्मार्टफोनमधील चीनी अॅप्स शोधते आणि त्याला डिलीट करण्याचे काम करते.
5 / 9
सध्या, हे अॅप गुगल प्ले स्टोअरच्या टॉप फ्री चार्टमध्ये अव्वल क्रमांकावर आहे. या अ‍ॅपला युजर्स चांगले रेटिंग देत आहे. याचे रेटिंग 8.8 आहे.
6 / 9
'Remove China Apps' च्या डाऊनलोडबद्दल बोलायचे झाले तर आतापर्यंत हे अॅप देशभरात 10 लाखाहून अधिक वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे.
7 / 9
हे अ‍ॅप सध्या केवळ अँड्रॉईड स्मार्टफोनसाठी असून त्याची साइज ३.५ एमबी आहे. या अॅपचे यूजर इंटरफेस सोपे आहे. स्कॅन चायनिज अ‍ॅपचा एक ऑप्शन आहे. जिथे चिनी अ‍ॅप्स टॅप करून शोधले जाऊ शकतात.
8 / 9
डिटेक्ट केल्यानंतर, हे अॅप फोनमध्ये कोण-कोणते चीनचे अॅप्स आहेत, हे प्रथम सांगते. यानंतर, आपल्याकडून परवानगी घेतल्यानंतर हे अॅप त्या चीनी अॅप्सला डिलीट करते.
9 / 9
'Remove China Apps' हे १४ मे रोजी गुगल प्ले स्टोअरवर अपलोड करण्यात आले होते. दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत हे अॅप भारतात लोकप्रिय झाले आहे.
टॅग्स :technologyतंत्रज्ञानchinaचीन