नव्या वर्षापूर्वीच Jio चा धमाका! या Prepaid Plan सोबत मोफत मिळतोय 75GB डेटा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2022 15:33 IST
1 / 6नवे वर्ष 2023 सेलिब्रेट करण्यासाठी रिलायन्स जिओने 2023 रुपयांचा खास प्रीपेड प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनसह कंपनी 9 महिन्यांसाठी रोज 2.5GB हायस्पीड डेटा देत आहे. याशिवाय, जिओ आपल्या जुन्या प्लॅनसोबतच अतिरिक्त फायदाही देत आहे. कंपनी यूजर्सना 75GB अतिरिक्त डेटा देत आहे.2 / 6रिलायन्स जिओ आपल्या 2,999 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनसह अतिरिक्त डेटा बेनिफीट्सदेखील देत आहे. वर्षभर वैधता असलेल्या या प्लॅनसह ग्राहकांना 75GB अतिरिक्त डेटाही दिला जात आहे. या प्लॅनमुळे आपला दर महिन्याला रिचार्ज करण्याचा त्रास कमी होईल.3 / 6जियोच्या 2999 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनसोबत एकूण 912.5GB डेटा दिला जातो. यूजर्सना रोज 2.5GB डेटा मिलतो. मात्र हा डेटा संपल्यानंतरही आपण 64kbps च्या स्पीडने अनलिमिटेड डेटा वापरू शकता.4 / 6याशिवाय यूजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि रोज 100SMS देखील दिले जातात. वर सांगितल्याप्रमाणे Jio च्या या प्रीपेड प्लॅनची वैधता संपूर्ण वर्षभराची म्हणजेच 365 दिवसांची आहे. यात जिओ अॅप्सची मोफत सेवाही दिली जाते. 5 / 6ऑफर - कंपनी नव्या वर्षाच्या निमित्ताने देत असलेल्या या ऑफरमध्ये, या प्रीपेड प्लॅनसह 75GB अतिरिक्त हाय स्पीड डेटा देखील देत आहे. याशिवाय यूजर्सना 23 दिवसांची एक्स्ट्रा व्हॅलिडिटीही मिळेल. जर आपली लॉंग टर्मसाठी प्लॅन घेण्याची इच्छा असेल, तर जीओचा हा प्लॅन आपल्यासाठी खूप चांगला ठरू शकतो.6 / 6कंपनीचा नवा प्लॅन - रिलायन्स जिओने नव्या वर्षापूर्वी 2023 रुपयांचा प्रीपेड प्लॅन लॉन्च केला आहे. यात 252 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. याशिवाय रोज 2.5GB डेटाही दिला जातो. अर्थात आपल्याला एकूण 630GB डेटा मिळतो. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग आणि रोजचे 100SMS देखील दिले जातात.