काय सांगता? इंटरनेटशिवाय आता शेअर करता येणार फोटो, व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 14:22 IST
1 / 8स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. फोटो, व्हिडीओ शेअर करण्यासाठी अनेकदा इंटरनेटचा वापर केला जातो. मात्र आता युजर्ससाठी एक खूशखबर आहे कारण इंटरनेटशिवाय त्यांना आता फोटो आणि व्हिडीओ शेअर करता येणार आहे. 2 / 8स्मार्टफोन कंपनी ओप्पो, विवो आणि शाओमीच्या स्मार्टफोन युजर्सना एकमेकांसोबत फाईल शेअर करण्यासाठी इंटरनेटची गरज लागणार नाही. या तिन्ही कंपन्यांनी एकत्र येऊन एक खास फीचर आणलं आहे. 3 / 8ओप्पो, विवो आणि शाओमी यांनी पिअर-टू-पिअर ट्रान्समिशन वाढवण्यासाठी एकमेकांशी भागिदारी केली आहे. त्यामुळे युजर्स आता इंटरनेटशिवाय फाईल्स, फोटो आणि व्हिडिओ शेअर करू शकणार आहेत. 4 / 8हायस्पीड, वायफाय डायरेक्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल अंतर्गत या तीन कंपन्यांमध्ये भागिदारी झाली आहे. यामध्ये या कंपन्यांचे युजर्स कोणत्याही इंटरनेट कनेक्टिव्हीटीशिवाय एकमेकांना फाईल्स पाठवू शकतात.5 / 8इंटरनेटशिवाय फाईल ट्रान्सफर करण्यासाठी ब्लूटूथ तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. मात्र ब्लूटूथपेक्षा जास्त वेगाने डेटा ट्रान्सफर होणार आहे. 6 / 8ओप्पोचे उपाध्यक्ष अॅण्डी वू यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओप्पो, विवो आणि शाओमी यांच्या जगभरातील युजर्सना सहजपणे फाईल्स ट्रान्सफर करता यावी हा या भागिदारीमागील मुख्य उद्देश आहे.7 / 8शाओमी, वन प्लस आणि नोकियानंतर आता चीनची स्मार्टफोन कंपनी ओप्पोदेखील टीव्ही निर्मितीच्या क्षेत्रात उतरणार आहे. 8 / 8ओप्पोने आतापर्यंत स्मार्टफोन आणि त्याच्याशी संबंधित डिव्हाईस तयार केले आहेत. मात्र आता आपला विस्तार वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने लाँचिंगबाबत कोणतीही घोषणा केली नसून टीव्हीचे नाव ओप्पो टीव्ही असणार असल्याची शक्यता आहे.