शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अशा प्रकारे ठेवा तुमचे पैसे सुरक्षित, ऑनलाइन ट्रान्झँक्शन करण्याआधी जाणून घ्या या बाबी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 5:33 PM

1 / 8
ऑनलाइन व्यवहार करताना योग्य ती खबरदारी न घेतल्यास तुम्हाला मोठ्या आर्थिक नुकसानास सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे ऑनलाइन ट्रान्झॅक्शन करताना काही बाबी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.
2 / 8
सुरक्षिततेसाठी ज्या ग्राहकांना ऑनलाइन ट्रान्झॅक्शन करता येते त्यांनीच ऑनलाइन ट्रान्झॅक्शन करावे.
3 / 8
एसबीआयने सांगितले आहे की, युनिफाइड पेमेंट्स इंटरफेज (यूपीआई) म्हणजेच इंटर-बैंक ट्रान्झॅक्शनसाठी इन्स्टट रियल टाइम पेमेंट सिस्टिमच्या माध्यमातून व्यवहार करण्यापूर्वी ग्राहकांनी पेमेंट कलेक्ट रिक्वेस्ट तपासून पाहिली पाहिजे.
4 / 8
सायबर कॅफेसारख्या सार्वजनिक ठिकाणांवरून पैशांचे ट्रान्झॅक्शन चुकूनही करू नये.
5 / 8
एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार ग्राहकांनी ओपन किंवा फ्री नेटवर्कवरून ट्रांजेक्शन करता कामा नये.
6 / 8
ट्रान्झॅक्शन करण्यासाठी व्हेरिफाइड तसेच विश्वसनीय ब्राउजर्सचाच वापर केला पाहिजे.
7 / 8
ग्राहकांनी व्यवहार करण्यासाठी केवळ 'https' वाल्या सिक्युअर्ड वेबसाइटचाच वापर केला पाहिजे.
8 / 8
ग्राहकांनी आपला पासवर्ड, वन टाइम पासवर्ड (ओटीपी), पिन, कार्ड व्हेरिफिकेशन कोड आणि यूपीआई पासवर्ड कुठल्याही परिस्थितीत त्रयस्त व्यक्तीला देऊ नये.
टॅग्स :technologyतंत्रज्ञानBanking Sectorबँकिंग क्षेत्र