1 / 9वनप्लसचा नॉर्ड सिरीजचा दुसरा फोन सीई ५ हा नुकताच लाँच झाला आहे. या फोनमध्ये ७१०० एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. सोबतच सोनीचा आयएमएक्स ६०० सेन्सर देण्यात आला आहे. एकंदरीतच परफॉर्मन्स, कॅमेरा कसा आहे हे पाहण्यासाठी आम्ही दोन आठवड्यांपासून हा फोन वापरून पाहिला. स्वस्तातला पर्याय असला तरीही हा फोन आम्हाला कसा वाटला, ते पाहुया...2 / 9वनप्लसने नॉर्ड सिरीजमध्ये एक स्वस्तातला पर्याय दिला आहे, OnePlus Nord CE 5 5G हा फोन एक गेल्यावेळच्या सिरीजपेक्षा एका चांगले अपग्रेड म्हणता येईल. कंपनीने या फोनची किंमत 22,999 रुपयांपासून 26,999 एवढी ठेवली आहे. या किंमतीत वनप्लसने थोडी कॉस्ट कटिंगही केली आहे. ती म्हणजे या फोनमध्ये स्टिरिओ स्पिकर देण्यात आलेले नाहीत. अलर्ट की देण्यात आलेली नाही. 3 / 9या फोनची बॅटरी मोठी आहे. 80W SuperVOOC चार्जर या फोनसोबत दिला जातो. यामुळे ती चार्ज करण्यासाठी एक तासापेक्षा थोडा जास्त म्हणजे ७० मिनिटांचा वेळ लागतो. दुसरी गोष्ट म्हणजे प्रोसेसर चांगला असल्याने ही बॅटरी जवळपास दोन-सव्वा दोन दिवस आरामात जाते. म्हणजे आज चार्ज केलात की डायरेक्ट परवाच चार्जर शोधायचा. आम्ही ती व्हिडीओ, गेमिंगसाठी देखील टेस्ट केली. एकंदरीतच प्रवास करणाऱ्यांसाठी किंवा गेमिंग, व्हिडीओ पाहणाऱ्यांसाठी तसेच ज्यांच्याकडे लोडशेडिंग आहे त्यांच्यासाठीही एक चांगला पर्याय ठरेल. 4 / 9या फोनमध्ये पाठीमागे 50MP Sony IMX600 सेंसर देण्यात आला आहे, जो ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनला सपोर्ट करतो. या कॅमेराने चांगल्या क्वालिटीचे फोटो शूट करता येतात. दिवसाचे चांगल्या डिटेल्सचे फोटो काढता येतात. रात्रीही बऱ्यापैकी हा कॅमेरा प्रभावी आहे. सेल्फी कॅमेरा १६ मेगापिक्सलचा आहे, तो दिवसाचे चांगले फोटो क्लिक करतो. परंतू, रात्री थोडे कमी गुणवत्तेचे फोटो येतात. फक्त एक काळजी घ्यावी लागते ती म्हणजे फोटो काढल्यानंतर ऑब्जेक्ट मुव्ह झाला तर थोडे ब्लर येतात. यामध्ये असलेला Ultra Steady मोड तुम्हाला क्लिअर फोटो घेण्यास मदत करतो. पाठीमागे ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा आहे, तो देखील चांगले फोटो क्लिक करतो. फोटोंचे कलर टेम्परेचर किंचित जास्त वाटले. 5 / 9या फोनमध्ये बजेट प्रोसेसर वापरलेला असला तरी तो तगडा आहे. MediaTek Dimensity 8350 Apex चा अंतूतू स्कोअर जवळपास १४ लाखांच्या वर आहे. यामुळे तुम्हाला अॅप टू अॅप मुव्हींग असेल किंवा सर्फिंग असेल कुठेही लॅग जाणवत नाही. बराच वेळ वापरला तरी फोन तापल्याचे जाणवत देखील नाही. 8 ते 12GB LPDDR5x पर्यंतची मेमरी यात दिलेली आहे, जी चांगल्याप्रकारे काम करते. आम्हाला या फोनमध्ये कोणतेही अॅप थांबल्याचे जाणवले नाही. चांगले हेव्ही गेम जसेकी बीजीएमआय आदी आम्ही यावर खेळून पाहिले. 6 / 9या फोनमध्ये 6.77 इंचाची ओएलईडी स्क्रीन देण्यात आली आहे. तिचा रिफ्रेश रेट हा १२० हर्ट्झ एवढा आहे. टच सँपलिंग रेटही ३०० हर्ट्झ एवढा आहे. यावर एचडीआर व्हिडीओ आरामात पाहता येतात. सुर्याच्या प्रखर प्रकाशातही ही स्क्रीन चांगली दृष्यमानता देते. ओल्या हाताने देखील फोन हाताळता येतो. 7 / 9यामध्ये तुम्ही एआय कॉ़ल ट्रान्सलेट, स्क्रीन ट्रान्सलेट आदी करू शकता. आम्ही या फोनमध्ये १०० हून अधिक अॅप इन्स्टॉल केली होती. यामध्ये गेमिंग अॅपही होती. कंपनीने काही प्री इन्स्टॉल अॅपही दिलेली आहेत. अनेक अॅप मागे चालत असूनही काही समस्या जाणवली नाही. आमच्याकडे आलेला फोन हा ८ जीबी, २५६ जीबी व्हेरिअंट होता. ज्याची किंमत 24,999 रुपये ठेवली आहे. सध्याच्या काळात फोटोची किंवा अॅपची साईज पाहिली तर हा व्हेरिअंट पुरेसा आहे. तुमचा बऱ्यापैकी डेटा यात राहू शकतो. 8 / 9एक कमी किंमतीतला वनप्लस फोन म्हणून याकडे पाहण्यास हरकत नाही. थोडे जास्त पैसे देऊन तुम्ही वनप्लस नॉर्ड ५ हा देखील घेऊ शकता. स्पीकर थोडा कर्कश आहे, रात्रीच्या वेळी सेल्फी कॅमेराचा परफॉर्मन्स एक सोडला तर तुम्हाला हा फोन चांगला परफॉर्मन्स, चांगली फोटोग्राफी आणि दैनंदिन वापरासाठी योग्य आहे. सारखे सारखे बॅटरी चार्ज करण्याचा त्रास तुमचा कमी होईल. जेणेकरून बॅटरी लाईफ जास्त काळ जवळपास दुप्पट चालेल. थोडा जड (199gm) आहे, परंतू त्या वेट मॅनेजमेंट चांगले आहे. महत्वाचे म्हणजे स्लीपरी नाही. तरीही कलरफुल केस सोबत देण्यात येते. चार्जर बॉक्समध्येच मिळतो. 9 / 9कंपनीने Android 15 नंतरच्या चार वर्षांच्या सिस्टीम अपडेट आणि सहा वर्षे सिक्युरिटी अपडेट्स देणार असे सांगितले आहे. जवळपास १० फाईव्ह जी बँड आहेत. वनप्लसचा जो डिस्प्लेचा प्रॉब्लेम होता, त्यावर कंपनीने लाईफ टाईम वॉरंटी आधीच जाहीर केलेली आहे. यामुळे डिस्प्लेवर हिरवी, लाल लाईन आली तर काय, हा प्रश्नसुद्धा मिटला आहे.