iqoo 9 series crossed 116 crore hundred million yuan sales in just 10 seconds know all details
iQOO 9 Series: ना ओप्पो ना विवो, शाओमीही नाही! ‘या’ कंपनीचा धुमाकूळ, १० सेकंदात विकले ११६ कोटींचे स्मार्टफोन By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 2:07 PM1 / 12गेल्या अनेक महिन्यांपासून स्मार्टफोन क्षेत्रात अनेकविध कंपन्या अत्यंत किफायतशीर दरात मोबाइल आणताना दिसत आहे. यामुळे स्पर्धा तीव्र होत असून, याचा फायदा ग्राहकांना आणि युझर्सना होत आहे. मात्र, एका कंपनीने धुमाकूळ घातला आहे. 2 / 12आताच्या घडीला Apple, सॅमसंग, शाओमी, रेडमी, एमआय, विवो यांसह अनेकविध कंपन्यांचे स्मार्टफोन भारतीय बाजारात उपलब्ध आहेत. आता तर कंपन्या 5G सेवा देणारे मोबाइलही लाँच करत आहेत.3 / 12iQOO चे स्मार्टफोन्स पहिल्या सेलसाठी उपलब्ध होताच दोन्ही स्मार्टफोन्सने जबरदस्त विक्री केली असून अवघ्या काही सेकंदात कोट्यवधींचे स्मार्टफोन्स विकले आहे. iQOO ने अलीकडेच iQOO 9 Series लाँच केली. iQOO 9 आणि iQOO 9 Pro हे दोन स्मार्टफोन्स या सीरिज अंतर्गत येत असून, या स्मार्टफोन्सची पहिली विक्री सुरू झाली.4 / 12चीनमधील पहिल्या सेलमध्ये या दोन्ही हँडसेटला युजर्सचा तुफान प्रतिसाद मिळाला. अवघ्या १० सेकंदात १०० मिलियन युआन (सुमारे ११६. २५ कोटी रुपये) किमतीचे फोन विकले गेले. कंपनीने हे स्मार्टफोन चीनमध्ये अनेक वेगवेगळ्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहेत.5 / 12iQOO ने नव्या आयकू 9 सीरीज अंतर्गत दोन पॉवरफुल स्मार्टफोन्स सादर केले आहेत. कंपनीनं iQOO 9 आणि iQOO 9 Pro स्मार्टफोन 12GB RAM, Snapdragon 8 Gen 1 चिपसेट आणि 120W fast charging अशा जबरदस्त स्पेक्ससह बाजारात आणले आहेत. 6 / 12चीनमध्ये या फोनची सुरुवातीची किंमत ४,९९९ युआन (सुमारे ५८ हजार रुपये) आहे. आयकू 9 5G मध्ये ६.७८ इंचाचा फुलएचडी+ ई5 अॅमोलेड डिस्प्ले १२० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. तर आयकू 9 प्रो मढी ६.७८ इंचाच्या २के क्वॉडएचडी+ ई5 अॅमोलेड एलटीपीओ २.० कर्व्ड स्क्रीन १२०हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि १५०० निट्स ब्राईटनेसला सपोर्ट करते. 7 / 12हे दोन्ही स्मार्टफोन अँड्रॉइड १२ ओएस बेस्ड ओरिजन ओएसवर चालतात. यात क्वॉलकॉमचा पॉवरफुल स्नॅपड्रॅगन 8 जेन वन चिपसेट देण्यात आला आहे. सोबत LPDDR5 RAM आणि UFS 3.1 storage टेक्नॉलॉजी मिळते. 8 / 12या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच मागे ५० मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. आयकू 9 प्रोमध्ये ५० मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि १६ मेगापिक्सलची पोर्टरेट लेन्स मिळते. 9 / 12तर आयकू 9 च्या कॅमेरा सेटअपमध्ये 50 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 12 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. आयकू 9 सीरीजच्या या दोन्ही फ्लॅगशिप स्मार्टफोनमधील बॅटरी एक सारखी आहे. यातील ४,७०० एमएएचची बॅटरी १२०वॉट फास्ट चार्जिंगने चार्ज करता येते. फक्त प्रो व्हर्जनमध्ये 50वॉट वायरलेस फास्ट चार्जिंग आणि 10वॉट रिवर्स चार्जिंगचे फिचर मिळते.10 / 12iQOO 9 8GB/128GB: ३,९९९ युआन (सुमारे ४६,५०० रुपये), iQOO 9 12GB/256GB: ४,३९९९ युआन (सुमारे ५१,५५० रुपये), iQOO 9 12GB/512GB: ३,९९९ युआन (सुमारे ५६,२५० रुपये) आहे. 11 / 12तर, iQOO 9 Pro 8GB/128GB: ४,९९९ युआन (सुमारे ५८,५०० रुपये), iQOO 9 Pro 12GB/256GB: ५,४९९९ युआन (सुमारे ६४,५०० रुपये), iQOO 9 Pro 12GB/512GB: ५,९९९ युआन (सुमारे ७० हजार रुपये) असल्याचे सांगितले जात आहे. 12 / 12हा स्मार्टफोन भारतात येऊन कशी कामगिरी करतो, ग्राहकांच्या पसंतीस तो उतरतो का, हे पाहावे लागेल, असे सांगितले जात आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications