शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

स्वस्तात फ्लॅगशिप अनुभव; 6 हजार रुपयांच्या डिस्काउंटसह iQOO चा जबरदस्त स्मार्टफोन

By सिद्धेश जाधव | Published: March 08, 2022 6:46 PM

1 / 6
iQOO 9 SE स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट बाजारात आले आहेत. यातील 8 जीबी रॅम आणि 128 जीबी मॉडेलची किंमत 33,990 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 12 जीबी रॅम आणि 256 जीबी मॉडेलची किंमत 37,990 रुपये आहे.
2 / 6
iQOO 9 SE स्मार्टफोनमध्ये 6.62-इंचाच फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळतो. जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 1,300 निट्स ब्राईटनेसला सपोर्ट करतो.
3 / 6
प्रोसेसिंगची जबाबदारी Snapdragon 888 चिपसेट सांभाळतो. सोबत 12GB पर्यंत रॅम आणि 256GB स्टोरेज मिळते. हा फोन अँड्रॉइड 12 बेस्ड फनटच ओएसवर चालतो.
4 / 6
iQOO 9 SE स्मार्टफोनच्या मागे ट्रिपल कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यात 48MP चा प्रायमरी कॅमेरा, 13MP चा अल्ट्रा-वाईड सेन्सर आणि 2MP मोनो सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16MP चा सेन्सर मिळेल.
5 / 6
iQOO 9 SE स्मार्टफोनमधील 4,500mAh ची बॅटरी 66W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
6 / 6
कंपनी या फोनवर 3 हजार रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट दिला जात आहे. हा डिस्काउंट ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डवर मिळत आहे. तसेच जुना फोन एक्सचेंज करून 3 हजार रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट मिळेल. अशाप्रकारे एकूण 6 हजार रुपयांची सूट मिळेल.
टॅग्स :Mobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड