शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अद्भुत अन् अविश्वसनीय : लेझर किरण पडताच वितळतील शत्रूंची ड्रोन अन् विमानेही, लष्कराचं नवं अस्त्र बघितलं का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 12:15 IST

1 / 10
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केलेल्या या ३० किलोवॅटच्या या लेझर आधारित अस्त्राची आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे यशस्वी चाचणी घेण्यात आली. या यशामुळे आता भारत अमेरिका, रशिया किंवा चीन यांसारख्या देशांच्या रांगेत आला आहे. (DRDO tests laser-based weapon, destroyed drone in seconds)
2 / 10
हे लेझर आधारित अस्त्र जमीन आणि जहाजांवरही तैनात करता येईल. त्यामुळे एकाच वेळी जल, पृथ्वी आणि आकाश अशा तिन्ही आघाड्यांवर भारताची शत्रूंवर करडी नजर राहील.
3 / 10
या यंत्रणेत ३६० अंशात लक्ष ठेवण्याची क्षमता असून यात बसवलेले इलेक्ट्रो-ऑप्टिकल आणि इन्फ्रारेड सेन्सर अहोरात्र शत्रूवर नजर ठेवून असतील.
4 / 10
३० किलोवॅट लेझर आधारित या अस्त्राचा वापर आकाशातून होणारे शत्रूचे हल्ले रोखण्यासाठी होणार आहे.
5 / 10
या यंत्रणेपासून ५ किमी हद्दीत आकाशात असलेली हल्लेखोर विमाने, ड्रोन किंवा हेलिकॉप्टर लेझरच्या माऱ्याने एका क्षणात नष्ट करण्याची क्षतमा या अस्त्रात आहे. त्यामुळे भविष्यातील असे हल्ले सहजपणे रोखता येतील.
6 / 10
भारतीय संशोधकांनी आधुनिक युगातील धोके ओळखून देशाच्या सुरक्षेचे कवच अधिक भक्कम करण्याच्या दृष्टीने ही यंत्रणा उभारली आहे.
7 / 10
आधुनिक युद्धतंत्रात सुरक्षेच्या दृष्टीने भारतीय यंत्रणा अधिक समृद्ध राहावी आणि भविष्यातील धोके टाळावेत हा यामागील उद्देश आहे.
8 / 10
आकाशातून अत्यंत वेगात होणारे ड्रोन, विमाने किंवा क्षेपणास्त्रांचे हल्ले अगदी काही क्षणांत रोखण्यासाठी हे तंत्र बहुपयोगी ठरणारे आहे.
9 / 10
जगात लेझर तंत्राचा वापर करण्याचा कल वाढत असताना सुरक्षेसाठी अशा अस्त्राची गरज लक्षात घेऊन ते विकसित करण्यात भारताने यश मिळवले आहे.
10 / 10
डीआरडीओच्या एका विभागाचे संचालक डॉ. जगन्नाथ नायक यांच्यानुसार, रविवारी मिळालेले यश खूप मोठे आहे. एका लेझर अस्त्राने एकाच वेळी अनेक लक्ष्यभेद करण्याची क्षमता भारताने मिळवली आहे. नव्या युगातील आधुनिक अस्त्राचा हा अवतार आहे.
टॅग्स :DRDOडीआरडीओIndian Armyभारतीय जवानDefenceसंरक्षण विभागtechnologyतंत्रज्ञान