WhatsApp वर काहीही डिलीट न करता असं लपवा पर्सनल चॅट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 16:14 IST
1 / 7WhatsApp हे संवाद साधण्याचं अत्यंत लोकप्रिय माध्यम असल्याने मोठ्या प्रमाणावर त्याचा वापर केला जातो. तसेच WhatsApp ही युजर्सचं चॅटींग अधिक मजेदार व्हावं म्हणून नवनवीन फिचर्स आणत असतं. 2 / 7स्मार्टफोनमध्ये सर्वांचीच खास अथवा महत्त्वाची माहिती असते. त्यामुळे अनेक जण फोनसाठी पासवर्ड सेट करतात. मात्र कित्येकदा तो पासवर्ड दुसऱ्या व्यक्तींना माहीत असल्याने ते अगदी सहज आपला फोन वापरतात. त्यामुळेच अनेकदा WhatsApp वरील पर्सनल चॅटही वाचले जाते. मात्र आता काळजी करायचं काही कारण नाही.3 / 7WhatsApp मध्ये एक असं फीचर आहे ज्याच्या मदतीने तुम्ही मेसेज डिलीट न करता पर्सनल चॅट लपवू शकता. आर्काइव (Archive) असं या फीचरचं नाव असून याच्या मदतीने अगदी सहज पर्सनल चॅट लपवून ठेवता येते. 4 / 7पर्सनल चॅट लपवून ठेवायचं असल्यास त्या व्यक्तीचे नाव सिलेक्ट करून बाजूच्या अॅरोवर क्लिक करा. अनेक पर्याय दिसतील त्यामध्ये Archive Chat सिलेक्ट करा. असं केल्यास ते चॅट स्क्रिनवर दिसणार नाही. 5 / 7Archive केलेलं चॅट पाहायचं असल्यास WhatsApp च्या स्क्रिनवर उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉटवर क्लिक करा. तिथे Archived या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला ते चॅट पाहायला मिळतील. तसेच हे पर्सनल चॅट Unarchive करायचं असल्यास Unarchived पर्यायावर क्लिक करा. 6 / 7WhatsApp च्या स्क्रिनवर जर तुम्हाला कोणतेच चॅट ठेवायचे नसल्यास सेटींगमध्ये बदल करता येतात. Tap Chats > Chat history > Archive all chats या पर्यायावर क्लिक करून सर्व चॅट Archive मध्ये टाकता येतात.7 / 7WhatsApp वर लवकरच Vacation Mode फीचर येणार आहे. या फीचरमुळे Archive केलेलं चॅट आपोआप Unarchive होणार आहे. Vacation Mode फीचरच्या माध्यमातून व्हॉट्सअॅपच्या रिंगटोनपासून दूर राहू शकता. त्यामुळे कोणत्याही अडथळ्याविना सुट्ट्यांमध्ये तुम्ही या फीचरचा वापर करू शकता. सध्या तरी हे फीचरची टेस्टिंग सुरू आहे.