शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तुमचा स्मार्टफोन हॅक झालाय का? कसं ओळखाल? काय कराल? जाणून घ्या महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 3:04 PM

1 / 9
सध्या देशात सर्वत्र स्मार्टफोन हॅकिंगची चर्चा सुरू आहे. पेगाससच्या माध्यमातून अनेक केंद्रीय मंत्री, न्यायाधीश, पत्रकारांचे फोन हॅक झाल्याची माहिती पुढे आली आहे. अनेक बड्या व्यक्तींचे फोन हॅक करण्यात आले आहेत.
2 / 9
प्रसिद्ध आणि महत्त्वाच्या व्यक्तींचेच फोन हॅक होतात असं अनेकांना वाटतं. मात्र सर्वसामान्यांचे फोनदेखील हॅक केले जातात. महत्त्वाच्या व्यक्तींचे फोन हॅक केल्यानं त्यांच्या फोनमधील गोपनीय माहिती मिळते. तर सर्वसामान्यांचे फोन हॅक करून हॅकर्स आर्थिक घोटाळे करतात.
3 / 9
इंटरनेटचा वापर वाढल्यानं त्या माध्यमातून होणाऱ्या आर्थिक व्यवहारांची संख्यादेखील वाढली. त्यामुळे मग सायबर गुन्हेदेखील वाढले. हॅकिंगच्या माध्यमातून होणाऱ्या आर्थिक घोटाळ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे हॅकिंगच्या बाबतीत सतर्क राहण्याची गरज आहे.
4 / 9
फोन हॅक झाला आहे ते ओळखण्यासाठी आम्ही काही टिप्स देत आहोत. फोन हॅक झाल्यावर डेटाचा वापर वाढतो. कारण इनफेक्टेड डिव्हाईस मॅलेशियस सर्व्हरसोबत जास्त वेळा संपर्क साधतो. सर्व्हरवरून अतिरिक् मालवेयर डाऊनलोड करून मोबाईल स्वत:ला अपडेट करतो. त्यामुळे डेटाचा वापर वाढतो.
5 / 9
मोबाईल हॅक झाला असल्यास तो बरीच महत्त्वाची माहिती हॅकर्स वापरत असलेल्या सर्व्हरवर पाठवत राहतो. त्यामुळे डेटाचा वापर अधिक होतो. त्यामुळे तुमचा फोन किती डेटा वापरत आहे त्यावर लक्ष ठेवा.
6 / 9
तुमचा फोन अचानक बॅटरीचा जास्त वापर करून लागल्यास सावध व्हा. अनेकदा मालवेअर सॉफ्टवेअर बॅकग्राऊंडमध्ये सुरू असतं. त्यामुळे बॅटरीचा वापर वाढतो. याशिवाय फोनच्या परफॉर्मन्सवरदेखील परिणाम होतो. तो वारंवार रिस्टार्ट होऊ लागतो.
7 / 9
तुम्ही इन्स्टॉल केले नसलेले ऍप मोबाईलमध्ये दिसू लागल्यास सतर्क राहा. फोन वापरता वापरता हँग होत असल्यास सावध व्हा. फोन हॅक झाल्यावर अनेकदा पॉपऍड दिसू लागतात.
8 / 9
वरील सर्व गोष्टी तुमच्या फोनसोबत होत असल्यास काही गोष्टी तातडीनं करायला हव्यात. सर्वात आधी तुमचा फोन रिसेट करा. याशिवाय तुमचे बँकिंग पासवर्ड, ईमेल आणि दुसऱ्या अकाऊंटचे पासवर्ड बदला.
9 / 9
फोन हॅक होऊ नये यासाठी तुम्ही काही गोष्टींची काळजी घेऊ शकता. कोणतंही ऍप प्ले स्टोअरमधूनच डाऊनलोड करा. कोणत्याही अज्ञात लिंक किंवा वेबसाईटवरून ऍप डाऊनलोड करू नका. फोनच्या सुरक्षेसाठी एखादं चांगलं अँटी व्हायरस सॉफ्टवेअर वापरा.
टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम