समुद्रात इंटरनेटचे जाळे! काही सेकंदांत मुव्ही डाऊनलोड होणार; पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2020 15:15 IST
1 / 11पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज समुद्रामध्ये चेन्नई ते पोर्ट ब्लेअरपर्यंत टाकलेल्या अंडर सी केबल लिंकचे उद्धाटन केले. या ऑप्टिकल फायबर केबलमुळे आता अंदमान, निकोबार बेटेही वेगवान इंटरनेटशी जोडले गेले आहेत. 2 / 11याच्या उद्घाटनावेळी मोदी म्हणाले की, आज अंदमानला जी सुविधा मिळाली आहे तिचा फायदा तिथे येणाऱ्या पर्यटकांनाही होणार आहे. चांगले इंटरनेट हे आज कोणत्याही ठिकाणाची प्राथमिकता बनली आहे. 3 / 1124 महिन्यांपेक्षाही कमी कालावधीत बीएसएनएलने ही केबल टाकली आहे. ओएफसी कनेक्टिव्हीटीमुळे या द्विपांवर 4जी मोबाईल सेवा आता आणखी वेगवान होणार आहे. यामुळे टेलिएज्युकेशन. टेलि हेल्थ, ई-गवर्नेंस सर्व्हिसेस आणि पर्यटनसारख्या डिजिटल सेवा मिळणार आहेत. 4 / 11समुद्रात ही केबल टाकण्यासाठी एका खास प्रकारच्या जहाजाचा वापर करण्यात आला. या जहाजावर ही केबल गुंडाळलेली असते. तर शेतात नांगर चालविण्यासारख्या उपकरणाद्वारे ही केबल समुद्राच्या तळाशी टाकली जाते. 5 / 11नांगरासारखी ही मशीन केबल असलेल्या जहाजासोबत जाते आणि समुद्र तळाशी केबल टाकण्यासाठी सपाट जमीन तयार करते. तिला कॅमेरा असल्याने जहाजावरील मॉनिटरवर पाहिले जाते. 6 / 11केबल टाकत असताना जर आणखी एखादी केबल जात असेल आणि ती आडवी येत असेल तर एक खास तंत्रज्ञान वापरले जाते. जिथे ती केबल संपते तिथून ती केबल उचलून समुद्राच्या वर आणली जाते. यानंतर रिमोटद्वारे ऑपरेट होणाऱ्या छोट्या गाडीचा वापर करून ती केबल जोडून पुन्हा खाली टाकली जाते. 7 / 11यानंतरही केबल पूर्ण टाकून झाल्यावर तपासणी केली जाते, की केबल नीट टाकण्यात आली की नाही. कारण समुद्राच्या तळावर डोंगरासारखे उंचसखल भाग असतात. त्याची काळजी घेतली नाही तर ती केबल तुटण्याची शक्यता असते. असे झाल्यास इंटरनेट बंद पडू शकते. 8 / 11चेन्नई ते पोर्ट ब्लेअरमध्ये समुद्रात 2313 किलोमीटर केबल टाकण्यात आली आहे. याचा खर्च 1224 कोटी रुपये आला आहे. ऑप्टिकल फायबर केबल टाकल्यानंतर अंदमानसह सात बेटे वेगवान इंटरनेटद्वारे जोडली गेली आहेत. 9 / 11यामध्ये जी बेटे सहभागी आहेत त्यात पोर्ट ब्लेअर, स्वराज, लाँग आयलंड, रंगत, छोटे अंदमान, कामोर्ता, कार निकोबार आणि ग्रेटर निकोबार बेटे आहेत. 10 / 11या बेटांवर राहणाऱ्या लोकांना 400 Gb/second ते 200 Gb/second चा वेग भेटणार आहे. 11 / 11पोर्ट ब्लेयर मध्ये 2x200(Gbps) ची बँडविड्थ देण्यात आली आहे. तर 2x100 Gbps अन्य बेटांना देण्यात आली आहे.