शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Facebook देणार मोफत इंटरनेट, कसं ते जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2020 10:10 IST

1 / 10
फेसबुक एका नव्या अॅपचे टेस्टिंग करत आहे. जे डेव्हलपिंग कंट्रीजसाठी आहे. Discover नावाच्या अॅपच्यामाध्यमातून फेसबुक कंपनी फ्री ब्राऊजिंग डेटा देणार आहे. यासाठी फेसबुक लोकल टेलिकॉम कंपन्यांसोबत भागिदारी करणार आहे.
2 / 10
दरम्यान, फेसबुकने Discover अॅपचा पहिला ट्रायल पेरूमध्ये सुरु केला आहे. मात्र, यानंतर कंपनी थायलंड, इराक आणि फिलिपिन्स यांसारख्या देण्यामध्ये याचा विस्तार करण्याची शक्यता आहे.
3 / 10
या अॅपच्या माध्यमातून फेसबुक कंपनीकडून युजर्सला दररोज फ्री डेटा मिळेल आणि याची माहिती त्यांना नोटिफिकेशनच्या माध्यमातून देण्यात येईल. फ्री बेसिक्सला भारतात बंदी घालण्यात आली होती. त्याप्रमाणे हे Discover अॅप वेबसाइटमध्ये भेदभाव करू शकत नाही.
4 / 10
खरंतर, फेसबुकचा फ्री डेटा स्लो असणार आहे. इतका स्लो असणार आहे की, युजर्सला कोणत्याही वेबसाइटचा फक्त टेक्स्ट लोड करू शकता. व्हिडीओ चालू शकणार नाही.
5 / 10
तुम्हाला माहीत असेल की, फेसबुकने काही वर्षांपूर्वी फ्री बेसिक्सचा निर्णय घेतला होता. याद्वारे फेसबुकने पैशांशिवाय काही वेबसाइट ओपन करण्यासाठी इंटरनेट देण्याचे म्हटले होते. म्हणजेच फ्री बेसिक्सच्या माध्यमातून फेसबुक आणि मेसेंजरसह काही निवडक न्यूज आणि इतर कॉन्टेंटचे अॅक्सेस दिले असते.
6 / 10
अनेक देशांमध्ये नेट न्युट्रॅलिटीच्या विरोधात असल्याचे सांगून यावर बंदी घातली. भारतात सुद्धा २०१६ मध्ये याला विरोधात झाला होता. त्यामुळे यावर बंदी घातली. दरम्यान, Discover अॅपसोबत असे होणार नाही आणि हे अॅप कोणत्याही वेबसाइटमध्ये डिस्क्रिमिनेट करत नाही.
7 / 10
फेसबुकने असा दावा केला आहे की, Discover अॅपचा वापर करण्यासाठी युजर्सना फेसबुकचे अकाऊंट असणे गरजेचे नाही.
8 / 10
तसेच, कंपनीने म्हटले आहे की, युजर्सची ब्राऊजिंग हिस्ट्री कलेक्ट केली जाणार नाही. त्यामुळे युजर्सच्या प्रायव्हसीचा प्रश्नच उपस्थित होत नाही.
9 / 10
फेसबुकच्या माहितीनुसार, फेसबुक जाहिरातीसाठी Discover युजर्सच्या अॅक्टिव्हिटी सुद्धा स्टोर केल्या जाणार नाहीत.
10 / 10
दरम्यान, फेसबुक कंपनीने भारतात Discover साठी काय प्लॅन आखला आहे. याबाबत कंपनीने अद्याप काहीच स्पष्ट केले नाही.
टॅग्स :FacebookफेसबुकInternetइंटरनेट