फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 11:17 IST
1 / 9Mark Zuckerberg : आजच्या डिजिटल युगात झपाट्याने बदल होत आहेत. नवीन तंत्रज्ञान येत आहेत. सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सने म्हणजेच AI ने खूप मोठे बदल केले आहेत. हे तंत्रज्ञाने लोकांच्या उपयोगी आहे. या तंत्रज्ञानामुळे अनेकांची कामे काही सेकंदात होत आहेत.2 / 9फेसबुकची मेन कंपनी मेटा आता एआयमध्ये उतरली आहे. मेटा आता अमेरिकेत कॉन्ट्रॅक्टर्सना ताशी तब्बल ५५ डॉलर म्हणजेच सुमारे ५ हजार रुपये इतके मानधन देत आहे. भारतासारख्या देशांसाठी स्थानिक संस्कृती आणि भाषेशी संबंधित चॅटबॉट तयार करण्यासाठी हे पैसे खर्च केले जात आहेत.3 / 9मेटा फक्त कोडर्संना घेत नाही. ज्यांना स्टोरीटेलिंग, कॅरेक्टर क्रिएशन आणि प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगमध्ये किमान सहा वर्षांचा अनुभव आहे. तसेच ज्यांना हिंदी, इंडोनेशियन, स्पॅनिश किंवा पोर्तुगीज सारख्या भाषांमध्ये येतात, अशांना कंपनी प्राधान्य देणार आहे.4 / 9या चॅटबॉट्सचे उद्दिष्ट म्हणजे लोकांना इंस्टाग्राम, मेसेंजर आणि व्हॉट्सअॅपवर स्थानिक आणि वास्तविक वाटणाऱ्या एआय व्यक्तिमत्त्वांशी कनेक्ट राहतील जेणेकरुन ते स्तानिक वाटतील.5 / 9AI चॅटबॉट्स फक्त टेक्नॉलॉजी टूल्स न राहता लोकांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनावेत, असे झुकेरबर्ग यांचे व्हिजन आहे. चॅटबॉट्स खऱ्या मित्रांसारखे वागतील आणि आपल्या दैनंदिन गरजा सोप्या करतील, असे झुकेरबर्ग यांचे मत आहे.6 / 9हा काही पहिलाच प्रयोग नाही. २०२३ मध्ये, मेटाने केंडल जेनर आणि स्नूप डॉग सारख्या सेलिब्रिटी-आधारित एआय बॉट्सचे व्हर्जन लाँच केले, पण ते जास्त काळ टिकले नाहीत. २०२४ मध्ये, कंपनीने एआय स्टुडिओ आणला. याद्वारे सामान्य वापरकर्ते देखील त्यांचे स्वतःचे चॅटबॉट्स तयार करू शकतात.7 / 9भारतात इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपचे कोट्यवधी वापरकर्ते आहेत. यामुळे हिंदी चॅटबॉट्स सुरू करणे मेटासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. जर हे बॉट्स भारतीय वापरकर्त्यांच्या भाषा आणि संस्कृतीशी जोडले गेले तर कंपनीची गुंतवणूक आणि महसूल दोन्ही वेगाने वाढेल, असे मत झुकेरबर्ग यांचे आहे.8 / 9चॅटबॉट्स तयार करणे सोपे नाही. मेटाच्या एआय बॉट्सनी संवेदनशील डेटा लीक केला आणि अनेक वेळा अनुचित कंटेंट तयार केला, असल्याचा आरोप यापूर्वी झालेला आहे. अमेरिकन सिनेटरनीही कंपनीकडून उत्तर मागितले होते. इंडोनेशिया आणि अमेरिकेतील काही चॅटबॉट्समधील वादग्रस्त पात्रांनी म्हणूनच यावेळी मेटा स्थानिक निर्माते आणि तज्ञांना सामील करून वास्तविक आणि सुरक्षित पात्रे तयार करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.9 / 9मेटा सध्या कंटेटवर लक्ष केंद्रीत करत आहे. कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. म्हणूनच ते लेखक आणि सांस्कृतिक तज्ञांमध्ये गुंतवणूक करत आहे. हिंदी चॅटबॉट्सचा भारतात किती प्रभाव पडतो हे पाहणे महत्वाचे आहे.